Diet Tips: उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

Diet Tips: उन्हाळ्यामध्ये आहारात काही बदल करणं महत्त्वाचं आहे.
DIET TIPS
DIET TIPS SAKAL

Diet Tips : शहरात उन्हाचा चटका वाढत आहे. कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या दिशेने उसळी मारत आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढणार नाही. उलट, शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतील, अशा आहाराचा समावेश करा, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

डॉ. शशांक जोशी म्हणाले, ‘‘उन्हाळ्यात फारसे जेवण जात नाही. त्यामुळे पोळी, भाकरी, भात अशा कर्बोधकयुक्त आहाराऐवजी ताक, सूप अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा. हा द्रव पदार्थांचा आहार दिवसातून दर दीड-दोन तासांनी घ्यावा. वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे, कटलेट, पॅटीस करावे. त्यातून शरीराला योग्य पोषणमूल्य मिळते.’’ (Include these things in your diet to stay fit in summer)

DIET TIPS
Diet Tips: जास्त प्रमाणात भुईमुगाच्या शेंगा खाणं ठरू शकते हानिकारक

लेपरो ओबेसो सेंटरच्या आहारतज्ज्ञ (Dietitian) राधिका शहा यांनी सांगितले की, ‘‘उन्हाळ्यात खाण्यापेक्षाही शरीरातील हायड्रेशन महत्त्वाचे असते. शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घ्यायला हवी. त्यासाठी पाणी, लिंबू पाणी, नारळपाणी अशा शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. ज्यूसपेक्षा फळे खाण्यावर नागरिकांनी भर देण्याची गरज आहे.’’

अशी घ्यावी काळजी

भोजन - ताजे पदार्थ, हिरव्या भाज्या जेवणात घ्या

काकडी, कांदा, टोमॅटो, पुदीना ताटात वाढून घ्या

ज्वारी, नाचणीची भाकरी उत्तम

फळे- उन्हाळ्यातील ताजी हंगामी फळे खा

कलिंगड, टरबूज, खरबूज, द्राक्षे अशा पाणीदार फळांचा आहारात समावेश करा

DIET TIPS
Image Gallery: उन्हाळ्यात व्यायाम करताय? या गोष्टींची घ्या काळजी

पेय- भरपूर पाणी प्या

ताक, लिंबू पाणी, नीरा, वेगवेगळी सरबते घ्या

फळांच्या रसात साखरेचे प्रमाण अत्यल्प ठेवा

मीठ-साखर-पाणी घ्या

शहाळे, कैरीचे पन्हे आवर्जून घ्यावे

हे टाळा - तळलेले व मसाल्याचे पदार्थ

जंक फूड, मांसाहार

चहा, कॉफी, अल्कोहोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com