esakal | फेस ऑईल, सिरम आणि एसेंसमध्ये काय फरक आहे? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

फेस ऑईल, सिरम आणि एसेंसमध्ये काय फरक आहे? वाचा सविस्तर

फेस ऑईल, सिरम आणि एसेंसमध्ये काय फरक आहे? वाचा सविस्तर

sakal_logo
By
अर्चना बनगे

आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आपण काही गोष्टी करतो त्यावेळी आपल्याला बेसिक क्लोजिंग टॅनिंग आणि मॉइश्चरायझिंग एवढेच माहीत असते.परंतु आज आपल्या त्वचेच्या समस्या अत्यंत जटिल होत गेल्या आहेत. काही वर्षापूर्वी या समस्या 10 टप्प्यापर्यंत होत्या व त्या आता बारा पर्यंत पोहोचल्या आहेत. या मध्येच सिरम याचा समावेश आहे. फेस ऑइल आणि इसेंस हे आपल्या सकाळ आणि संध्याकाळच्या स्किन केअर रुटीने मध्ये अत्यावश्यक घटक बनले आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे काय हे दोन्ही घटक किती वेगवेगळे आहेत. हे घटक वापरताना आपण ते ज्या क्रमाने लावणे आवश्यक आहे ते आपण लावतो काय ? याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक अशी माहिती याठिकाणी देत आहोत.

फेस सेन्स

जर तुम्हाला वाटत असेल कि फेस इसेन्स टोनर हे नव्या जमान्यातील एक फॅन्सी वर्जन आहेत तर ते चुकीचे आहे. यामध्ये टोनर चे महत्व अत्यंत आहे आणि याचं मूळ स्तोत्र हे कोरिया मधून आले आहे. इसेन्स मध्ये असणारे घटक हे सारखीच असतात आणि हे टोनर च्या तुलनेत अधिक मुलायम असते. याचा वापर क्लिंजर आणि टोनर नंतर परंतु सिरम च्या अगोदर करावयाचे असते. हे घटक आपल्या त्वचेच्या स्किन केअर प्रॉडक्टच्या परिणामकारक साठी फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला वाटत असेल की आयक्रीम आणि मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेला मुलायम करण्यास सक्षम नसेल तर तुम्ही त्वचेवर फेस सेन्स वापर करू शकता.

फेस सीरम

फेस सीरम मध्ये ऍक्टिव्ह इंटिग्रेटेडचे हायर कॉन्सन्ट्रेशन असते. हे वेगवेगळ्या प्रकारे मध्ये येतात.हायल्यूरोनिक एसिड, विटामिन सी, ग्लाइकोलिक एसिड आणि सर्व इंग्रीडिएंट्स जे त्वचा चे वेगवेगळे समस्या लक्षात घेऊन तयार केले आहेत. हे सीरम मॉइस्चराइज़र चे काम करत नाही परंतु त्याची त्वचेला आवश्यकता आहे . हे उत्पादन ऐंटी-एजिंग, स्किन ब्राइटेनस आणि इलैस्टिसिटी हे घटक ध्यानात ठेवून केलेले असतात. सीरम चा वापर मॉइस्चराइज़र च्यापूर्वी आणि एसेंस नंतर करण्याचे आहे. सिरम लावल्यानंतर कमीत कमी दहा मिनिटे थांबून त्यानंतर अन्य प्रोडक्ट चा वापर करावा.

फेस ऑइल

याचा वापर आपण मॉइस्चरायझर बरोबर मॉइस्चरायझर प्रमाणेच करू शकतो. हे प्रोडक्ट तेलकट आणि जर तुमच्या चेहऱ्यावर मोडी असतील तर याचा वापर योग्य नाही. परंतु अशा त्वचेसाठी ही एक फेस ऑइल येते. परंतु त्यानंतरही मोडीची समस्या असेल तर फेस ऑइलच्या वापरा पासून दूर राहिले पाहिजे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचा वापर करावा. हे चेहऱ्याचे मॉलिश करण्यासाठी डीप कंडिशनिंग आणि भरपूर पोषण युक्त आहे. यामुळे त्वचाला एक वेगळी उभारी येते. नाईट टाईम रूटीनमध्ये फेस ऑईलचा वापर सर्वात शेवटी करावा. याचा वापर केल्यानंतर अन्य प्रॉडक्ट जर तुम्ही चेहऱ्याला लावला तर तुमच्या त्वचेला त्याचा काहीही फायदा मिळणार नाही.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.