Diy Hair Colour : केमिकलवाले कलर्स विसरा, आता वापरा फक्त नैसर्गिक हेअर डाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diy Hair Colour

Diy Hair Color : केमिकलवाले कलर्स विसरा, आता वापरा फक्त नैसर्गिक हेअर डाय

Diy Hair Colour : हेअर डाय करणं आजकाल खूप आवडती फॅशन झाली आहे. सगळ्याच मुलींना हेअर डाय करणं आवडतं निदान एकदा तरी आपण हेअर कलर करावा असं प्रत्येकीला वाटत असतं आणि खरंतर केसांमधले छोटेसे बदलही आपला लूक पूर्णपणे बदलू शकतात. पण हेअर कलर करणं किंवा हेअर डाय करणं केसांसाठी खूप हानिकारक ठरू शकत. कारण कोणतंही केमिकल हे केसांसाठी चांगलं नसतं.

हेही वाचा: Manohar Parrikar Birth Anniversary : मनोहर पर्रिकरांची ती शेवटची इच्छा अपूर्णचराहिली...

पण गंमत म्हणजे तुम्ही नैसर्गिकरीत्या देखील घरगुती गोष्टींचा वापर करून आपल्या केसांना कलर करू शकतात. तुम्ही घरगुती साहित्यांचा वापर करून केसांना कलर करू शकता. तुम्ही कॉफी तर पितच असाल, पण तुम्हाला माहिती आहे का याच कॉफी पासून तुम्ही हेअर डाय करू शकता.

हेही वाचा: Manohar Parrikar Birth Anniversary : मनोहर पर्रीकर लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांना म्हणाले सर्जीकल स्ट्राईक करा पण...

कॉफी कलर हेअर डाय बनवण्याची पद्धत

स्टेप १

नॅचरल कॉफी कलर बनवायचा असेल तर, दोन चमचे हेअर कंडीशनर, दोन चमचे कॉफी पावडर आणि एक कप पाणी घ्या.

हेही वाचा: Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

स्टेप २

नैसर्गिक कॉफी कलर बनवण अत्यंत सोप आहे. गॅसवर पॅन ठेवा, त्यात एक ग्लास पाणी टाका. दोन चमचे कॉफी पावडर टाका. त्यानंतर चमच्याने हे मिश्रण एकत्र मिक्स करा. जेव्हा पाणी आणि कॉफीच्या मिश्रणाला उकळी येईल तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात दोन चमचे हेअर कंडीशनर मिसळा आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून एका पातील्यात काढून घ्या.

हेही वाचा: Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

स्टेप ३

केसांना कलर करणारा ब्रश घ्या आणि तयार मिश्रण ब्रशच्या सहाय्याने केसांना लावा. ज्या प्रकारे आपण मेहेंदी केसांना लावतो त्याच प्रकारे हे कॉफी मिश्रण केसांना लावा. हे मिश्रण केसांवर एक तास तसेच ठेवा. एक तास झाल्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस चांगले धुन घ्या. केसांना मस्त तपकिरी कलर येईल शिवाय याने केस सुंदर आणि चमकदार दिसतील.