Manohar Parrikar Birth Anniversary : मनोहर पर्रीकर लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांना म्हणाले सर्जीकल स्ट्राईक करा पण...

मनोहर पर्रीकर यांचे अभूतपूर्व संरक्षण मंत्री असे वर्णन
Manohar Parrikar Birth Anniversary
Manohar Parrikar Birth Anniversary esakal

Manohar Parrikar Birth Anniversary : भारतावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे सडेतोड उत्तर म्हणजे उरी – द सर्जीकल स्ट्राईक. पाकीस्तानला हे उत्तर देण्यात प्रमुख भूमिका होती केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची. त्यांचा आज स्मृतिदीन आहे. त्याच निमित्ताने निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी पर्रीकरांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. त्या पाहुयात.

Manohar Parrikar Birth Anniversary
Manohar Parrikar Birth Anniversary : मनोहर पर्रिकरांची ती शेवटची इच्छा अपूर्णचराहिली...

सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हटल्या जाणार्‍या निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी मनोहर पर्रीकर यांचे अभूतपूर्व संरक्षण मंत्री असे वर्णन केले आहे. सतीश दुआ यांनी २०१६ च्या उरी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची पहिल्यांदा भेट कशी झाली याबद्दल सांगतात, “मनोहर पर्रीकर यांच्यासोबतची पहिली भेट अत्यंत वाईट वेळी झाली. उरी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच ते थेट गोव्यातून दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरला पोहोचले.

Manohar Parrikar Birth Anniversary
Indian Parliament Attack : संसदेवरील हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी 13 तारीखच का निवडली

मी त्यांना घ्यायला गेलो. त्या हल्ल्यात आमचे १८ जवान शहीद झाले. प्रथम त्यांनी माझ्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर काही वेळाने मी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला दोनच गोष्टी सांगितल्या.

Manohar Parrikar Birth Anniversary
Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

पहिला प्रश्न त्या ऑपरेशनशी संबंधित असल्याने मी तो जगजाहीर करू शकत नाही. पण, दुसरा मुद्दा ऐकून मी प्रभावित झालो. मनोहरजी म्हणाले की, तूम्ही सर्जिकल स्ट्राईक करा पण, मला अशी खात्री द्या की आपल्याकडील एकही जवान शहीद होणार नाही. असा विश्वास तूम्हाला असेल तरच मी तूम्हाला सर्जीकल स्ट्राईकची परवानगी देतो.

Manohar Parrikar Birth Anniversary
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

मी त्यांना पूर्ण विश्वास दिल्यावर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करण्यास परवानगी दिली. त्यामुळे दहशतवाद्यांना 10 दिवसांत चोख प्रत्युत्तर देण्यात आले. चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ या पदावरून निवृत्त झालेले सतीश दुआ म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्री असताना अनेक धाडसी निर्णय घेतले. लष्करात वर्षानुवर्षे रखडलेल्या अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली. त्याच्यासोबत काम करणे संस्मरणीय होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com