
सध्या इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी सहज मिळवता येतात. यात गुगल सर्चींग ऑप्शनने तर प्रत्येकाचे जीवन सुसह्य केले आहे. मात्र कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. सध्या पोर्नोग्राफीबात असं घडताना दिसतंय. इंटरनेटमुळे अनेकांना पोर्नोग्राफी पाहण्याची सवय झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पोर्नोग्राफी पाहल्याने मेंदूवर काय परिणाम होतो? (do you know side effects of watching porn video read story)
पॉर्न व्हिडिओ पाहल्याने शरीरात हार्मोन्सचा स्राव वाढतो. ज्याचा परिणाम थेट मेंदूवर दिसून येतो. पॉर्न पाहिल्यानंतर डोपामाइन हार्मोन्सही (dopamine Hormone) वाढतात. मेंदूच्या स्ट्रायटमचा (striatum) भाग संकुचित होतो.
अनेकांची सेक्स लाईफ यामुळेच बिघडते. तुम्ही जर अति प्रमाणात पॉर्न व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यात कोणत्याही प्रकारचा उत्साह शिल्लक राहत नाही. तुम्ही सेक्स लाईफ विषयी संवेदनशील राहत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या आयुष्यावर होतो. पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. जर त्यांनी या सर्व गोष्टीला सीरिअसली घेतले नाही तर त्यांना मानसिक आजार होण्याची जास्त भीती असते.
या शिवाय याचा थेट परिणाम नाते संबंधावरही होतो. वैवाहीक जीवनासोबत सेक्स लाईफ बोरींग होते. इंटरनेटवरील पोर्नोग्राफीची नक्कल करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे ज्याचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
याशिवाय अस्वस्थता, कमजोरी, नकारात्मक भावना, व्यसनाधीनता, विकृत समज, नकारात्मक भावना यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.