
Egg Health Benefits: अंडे हे एक उत्तम टॉनिक आहे. विशेषतः रोज व्यायाम करणारे, कष्टाची कामे करणारे, वाढीची मुले मुली, गर्भवती स्त्रिया, बाळंतीणी, खेळाडू यांनी आपल्या रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करायला हरकत नाही. एका अंड्यात साधारणतः आठ ग्रॅम प्रथिने (चार पोळ्यांइतके) व 75 ग्रॅम उष्मांक (कॅलरीज) असतात. अंड्यातील प्रथिनांची "बायोलॉजीकल व्हॅल्यू' व "नेट प्रोटिन युटीलायजेशन' हे मांसाहार व दुधापेक्षाही जास्त आहे.