Soap Use : तुमचं संपूर्ण कुटुंब आंघोळीसाठी एकच साबण वापरतंय का? मग ही माहिती वाचाच

संपूर्ण कुटुंब आंघोळीसाठी आणि हात धुण्यासाठी एकाच साबणाचा वापर करत असेल तर या काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
Soap Use
Soap Useesakal

Soap Use : साबणाचा उपयोग शरीरावरील बॅक्टेरिया आणि जंतूंपासून बचाव त्वचेचा बचाव करण्यासाठी केला जातो. मात्र हाच साबण जर बॅक्टेरिया जमा होण्याजी जागा बनल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा किती गंभीर परिणाम होईल याचा विचार तुम्ही केलाय का? जर संपूर्ण कुटुंब आंघोळीसाठी आणि हात धुण्यासाठी एकाच साबणाचा वापर करत असेल तर या काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.

घरात टीव्हीच्या रिमोट व्यतिरिक्त संपूर्ण कुटुंब एखादी कॉमन गोष्ट वापरत असेल तर ती आहे साबण. असे म्हणतात की एकाच ताटात जेवल्याने प्रेम वाढतं. मात्र एकाच साबणाचा वापर संपूर्ण कुटुंब करत असेल तर काय होईल? आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरावे की नाही?

साबणाच्या वडीवर असंख्य जंतू असू शकतात. इंडियन जर्नल ऑफ डेंटल रिसर्चमध्ये एप्रिल-जून २००६ मधील अभ्यासात असे दिसून आले की साबणावर २-५ वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असू शकतात. तर जुलै २०१५ मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलमध्ये एका रूग्णालयात केलेल्या अभ्यासात जवळपास ६२ टक्के साबणी दूषित होत्या. तर लिक्विड साबण फक्त ३ टक्के दूषित होत्या. साबणावर असलेले जंतू एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकते.

साबणावर कोणते कोणते जंतु असतात?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, साबणावर असलेले जंतू हे, ई-कोली, साल्मोनेला आणि शिगेला बॅक्टेरिया यांसारखे व्हायरस असू शकतात. याशिवाय नोरोवायरस आणि रोटावायरस आणि स्टॅपसारखे व्हायरस असू शकतात. यातील काही व्हायरस त्वचेवरील जखमा आणि रॅशेसमुळे एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतात. तर काही व्हायरस शौचाकडून आल्यानंतक त्याच साबणाने हात धुतल्याने पसरतात.

Soap Use
Moti Soap History : दिवाळीत घराघरात जागा करणाऱ्या मोती साबणाची इंटरेस्टिंग स्टोरी

एकच साबण वापरल्याने कोणता संसर्ग पसरू शकतो?

एकच साबण शेअर करणे सुरक्षित असले तरी संसर्ग पसरण्याचा धोकाही असतो. फ्लोरिडा विद्यापीठाच्या फुटबॉल खेळाडूंच्या 2008 च्या अभ्यासात, ज्यांनी एकच साबण सगळ्यांत शेअर केला होता त्यांना मेथिसिलिन-प्रतिरोधक स्टॅफिलोकोकस ऑरियस (MRSA) आणि एक प्रतिजैविक-प्रतिरोधक स्टॅफ संसर्ग होण्याची शक्यता जास्त होती. यामुळे, यूएस सीडीसी देखील साबणासारख्या वैयक्तिक वस्तू शेअर न करण्याची शिफारस करते.

Soap Use
Soap Benefits : तूम्हीही रोज साबण लावून अंघोळ करता का?; आधी हे वाचाच!

साबणाने संसर्ग होऊ नये म्हणून काय करावे?

सामान्यपणे सांगायचे तर, साबण शेअर केल्याने आरोग्यास मोठा धोका नाही. मात्र, तरीही हा संशोधनाचा आणि चिंतेचा विषय आहे. जर तुम्हाला बॅक्टेरिया वाढू नये म्हणून साबण शेअर करायचा नसेल किंवा वापरण्यास संकोच वाटत असेल, तर तुम्ही त्याऐवजी लिक्विड सोप किंवा बॉडी वॉशवर स्विच करू शकता आणि झिरो-टच डिस्पेंसर असलेला साबण देखील निवडू शकता. (Lifestyle)

Soap Use
Soap Attracts Mosquito : खरं की काय! डास केवळ माणसांचीच नाहीतर साबणाचीही पप्पी घेतात? संशोधकांनीच शोध लावलाय!

तुम्ही साबण कुटुंबासोबत शेअर करत असल्यास तुमच्या शरीरावर वापरण्यापूर्वी तो स्वच्छ धुतलेला आहे का याची खात्री करून घ्या. तसेच तुमची आंघोळ झाल्यानंतर परत एकदा इतरांच्या वापरापूर्वी धुतल्यानंतर ते कोरडे करण्यासाठी स्टँड वापरा. ओल्या साबणीवर बॅक्टेरिया जास्त साचतात.

साबणाचा निचरा करणारा स्टँड वापरा आणि नियमितपणे त्याला धुवून स्वच्छ ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com