Soap Attracts Mosquito : खरं की काय! डास केवळ माणसांचीच नाहीतर साबणाचीही पप्पी घेतात? संशोधकांनीच शोध लावलाय!

साबण देखील डासांना आकर्षित करू शकतो?
Soap Attracts Mosquito
Soap Attracts Mosquito esakal

Soap Attracts Mosquito :  उन्हाळ्यात डासांची दहशत वाढते. डासांमुळे लोकांची झोप उडते. ते टाळण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की साबणाचा सुगंध देखील डासांना आकर्षित करतो. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.

उन्हाळा चालू आहे. या ऋतूमध्ये लोकांनी आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक राहण्याची गरज आहे. उन्हाळ्यात डासांची दहशतही वाढते. या मोसमात डासांमुळे जनजीवन विस्कळीत होते. डासांमुळे लोकांना झोपणे कठीण झाले आहे. यापासून मुक्त होण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात.

लोक डासांना घालवण्यासाठी मच्छरदाणी, सर्व आऊट, मच्छरनाशक अगरबत्ती किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या मच्छरदाण्यांचा वापर करतात. तुम्हा सर्वांना माहित असेलच की घाणेरडे पाणी आणि अस्वच्छ ठिकाणी डास मोठ्या प्रमाणात आढळतात.

Soap Attracts Mosquito
Mosquito Quail Health Problems : डासांची घालवण्याची ही जूनी पद्धत आरोग्यासाठी घातक,संशोधकांचा दावा

तुम्हाला माहित आहे का की साबण देखील डासांना आकर्षित करू शकतो? तुम्ही आंघोळ करताना वापरत असलेल्या साबणाचा सुगंधही डासांना आकर्षित करण्याचे काम करते. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात हे समोर आले आहे.

फर्स्टपोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की काही साबणाचे सुगंध डासांचे काम सोपे करतात. चार वेगवेगळ्या ब्रँडच्या साबणांवर संशोधकांनी हे संशोधन केले. ज्यामध्ये काही साबणांचा सुगंध डासांना आकर्षित करतो.

Soap Attracts Mosquito
Mosquito Killer Side Effects : डासांना पळवायच्या नादात स्वत:चा जीव गमावून बसाल? हे काम आजपासूनच बंद करा!

साबणाचा वास आकर्षित करतो

डासांवर केलेल्या या संशोधनात संशोधकांनी अमेरिकेतील प्रसिद्ध 4 साबण ब्रँडचा वापर केला. संशोधकाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी साबणाचा मानवी त्वचेच्या सुगंधावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण केले. विश्लेषणाच्या आधारे असे आढळून आले की साबणाचा सुगंध डास तुमच्या जवळ फिरकणार की नाही हे ठरवू शकतो. वेगवेगळ्या सुगंधांच्या साबणांवर केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नारळाच्या वासापासून डास दूर होतील

संशोधकांनी सांगितले की कोकोनट-सुगंधी साबण वापरल्याने डास जवळ येऊ देत नाहीत. वेगवेगळ्या सुगंधांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, नारळातून बाहेर पडणाऱ्या रसायनांचा रक्त शोषणाऱ्या कीटकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे, जर तुम्हाला डास चावण्याचा धोका असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे डास जास्त असतील तर तुम्ही नारळ-सुगंधी साबण वापरू शकता.

Soap Attracts Mosquito
Mosquito Problem: धक्कादायक! कूलर लावू नका नाहीतर डासांची पार्टी सुरु होईल तुमच्या घरात...

संशोधकांना असेही आढळले की फळे आणि लिंबाचा सुगंध असलेले साबण जास्त डास आकर्षित करतात. व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि स्टेट युनिव्हर्सिटीचे डॉ क्लेमेंट विनागर यांनी सांगितले की, फुलांचा आणि फळांचा वास असलेली उत्पादने वापरल्याने डासांना वनस्पती आणि मानव यांच्यातील फरक समजत नाही, त्यामुळे ते मानवाकडे आकर्षित होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com