
थोडक्यात:
तरुण दिसण्यासाठी फक्त जीन्स (DNA) नाही, जीवनशैलीही महत्त्वाची आहे.
काही सवयी तुमचं वय लपवून तुम्हाला तरुण आणि ताजं ठेवू शकतात.
झोप, आहार, व्यायाम आणि स्किनकेअर यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज येतं.
Habits That Make You Look Younger Than Your Original Age: वयाच्या तुलनेत अधिक तरुण दिसणे हे फक्त चांगल्या जीन्सवर अवलंबून नसते तर हे चांगली जीवनशैली आणि सवयींवरही अवलंबून असते. चला, अशा काही दैनंदिन सवयी जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा बऱ्याच वर्षांनी लहान दिसू शकता.
झोप ही पेशींच्या नवनिर्मितीला चालना देत असून 7-9 तासांची शांत झोप त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते आणि तणावही कमी करते. झोपेची ठराविक वेळ ठेवणे आणि झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार करणे आवश्यक आहे. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते तसेच अपूर्ण झोपेमुळे होणारे पिंपल्स आणि डार्क सर्कल्स टाळता येतात.
दिवसभर भरपूर पाणी पिणं त्वचेसाठी उपयुक्त ठरतं. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही, त्वचेचा तजेलपणा आणि लवचिकता टिकून राहते. शरीर हायड्रेट राहण्यासाठी आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी दिवसाची सुरुवात कोमट लिंबूपाण्याने करणे फायदेशीर ठरते.
तेजस्वी त्वचा आणि चांगल्या आरोग्यासाठी अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी भरपूर आहार आवश्यक आहे. बेरीज, सुकामेवा, पालेभाज्या आणि मासे उपयुक्त ठरतात, तर साखर व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत, कारण ते त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात.
दररोजच्या शारीरिक हालचालीमुळे त्वचा निरोगी राहते, कारण त्यामुळे रक्ताभिसरण वाढून त्वचेच्या पेशींना आवश्यक पोषण मिळते. व्यायाम तणाव कमी करतो, मूड सुधारतो आणि शरीर सुडौल ठेवतो. त्यामुळे आपल्या दिनचर्येत कार्डिओ, ताकद वाढवणारे आणि लवचिकता वाढवणारे व्यायाम प्रकार संतुलितपणे समाविष्ट करणं उपयुक्त ठरतं.
दीर्घकालीन तणावामुळे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनचा ऱ्हास होतो आणि त्वचावर अकाली वृद्धत्वाची लक्षणं उमटू लागतात. तरुण आणि तजेलदार दिसण्यासाठी ध्यान, योग, जर्नलिंग यांसारख्या तणाव कमी करणाऱ्या तंत्रांचा वापर करा. यासोबतच निसर्गात वेळ घालवा किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या छंदांमध्ये सहभागी व्हा, जे मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतं.
अतिनील किरण हे अकाली वृद्धत्वाचे मुख्य कारण ठरतात. त्यामुळे, त्वचेला हानीपासून वाचवण्यासाठी नियमितपणे सनस्क्रीन लावा. तसेच अगदी ढगाळ दिवसांमध्ये आणि हिवाळ्यातही ही सवय पाळा. किमान SPF 30 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन निवडा आणि दिवसभरात आवश्यकतेनुसार ते पुन्हा लावा.
नियमित आणि सातत्यपूर्ण स्किनकेअर रुटीन हे निरोगी त्वचेसाठी अत्यावश्यक आहे. त्यात क्लिन्झिंग, एक्सफोलिएटिंग, मॉइश्चरायझिंग आणि रेटिनॉल सारखे सीरम तसेच वृद्धत्वविरोधी कार्य करणाऱ्या प्रोडक्ट्सचा समावेश करा. जर बाजारातील महागडे प्रोडक्ट्स तुम्हाला वापरायचे नसतील तर घरगुती उपाय वापरुन त्वचेची काळजी घ्या. आपल्या त्वचेच्या प्रकार आणि वयानुसार योग्य स्किनकेअर प्रोडक्ट्स निवडा आणि वापरा.
धूम्रपानामुळे त्वचेमध्ये कोलेजन आणि इलास्टिनचे नुकसान होते, ज्यामुळे सुरकुत्या येऊ लागतात. तर जास्त अल्कोहोल सेवन त्वचेला डी-हायड्रेट करतं आणि सूजही येते. या सवयी टाळणे किंवा कमी करणे हा त्वचेसाठी फायदेशीर उपाय आहे. धूम्रपान आणि अल्कोहोलच्या ऐवजी हर्बल टी किंवा स्पार्कलिंग वॉटर यांसारख्या आरोग्यदायी पर्यायांचा उपयोग करा.
तुम्हालासुद्धा तुमच्या वयापेक्षा तरुण दिसायचे असेल तर नियमित वाचन करणे, नवीन कौशल्ये शिकणे किंवा उत्तेजक संभाषणात सहभागी होणे अशा सवयी जोपासल्या तर मन तीक्ष्ण होते. तसेच सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनाकडे पाहा, प्रत्येक क्षण उत्साहाने आणि आशावादाने स्वीकारा. यामुळे तुमचं आयुष्य अधिक समृद्ध आणि आनंददायी बनते. कृतज्ञतेचा नियमित सराव करा आणि तुम्हाला सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा.
मजबूत सामाजिक संबंध तुमच्या भावनिक कल्याणासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि तरुणपणाची चमक टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. जे लोक तरुण दिसतात, ते नातेसंबंधांना प्राधान्य देऊन सक्रिय सामाजिक जीवन जगतात. कुटुंब, मित्र आणि समुदायाच्या कार्यक्रमांसाठी वेळ द्या आणि तुमचे सामाजिक बंधन मजबूत करा.
हे महत्त्वाचे जीवनशैलीतील बदल तुम्हाला तुमच्या वयाच्या तुलनेत तरुण दिसण्यासाठी मदत करतील. तुमचं आयुष्य संतुलित, आरोग्यपूर्ण आणि सकारात्मक ठेवण्यासाठी या सवयींचा अवलंब करा.
तरुण दिसण्यासाठी रोज किती तास झोप आवश्यक आहे?
(How many hours of sleep are necessary to look younger?)
दररोज 7 ते 9 तासांची शांत झोप त्वचेच्या आरोग्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी उपयुक्त ठरते.
कोणते अन्नघटक त्वचेला नैसर्गिक तेज देण्यास मदत करतात?
(Which nutrients help the skin glow naturally?)
अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध अन्न त्वचेला तेजस्वी ठेवण्यास मदत करतात.
सनस्क्रीन दररोज लावणं किती गरजेचं आहे?
(Is it important to apply sunscreen every day?)
होय, अतिनील किरणांपासून त्वचेला संरक्षण देण्यासाठी दररोज, अगदी ढगाळ दिवसांनाही SPF 30 सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे.
तरुण दिसण्यासाठी तणाव व्यवस्थापन का गरजेचं आहे?
(Why is stress management important to look younger?)
दीर्घकालीन तणावामुळे त्वचेला नुकसान पोहोचतं, म्हणून ध्यान, योग, जर्नलिंग किंवा छंद जोपासून तणाव कमी करणं आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.