
उपवासामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतेय? तुम्ही या ४ चूका करताय का?
Fasting Cause Weight Gain : कित्येक संस्कृती आणि धर्मांमध्ये उपवास(Fasting) करण्याची प्रथा आहे. उपवास केल्याने शरीराला डिटॉक्स करण्यासाठी असते आणि शरीरामध्ये अनावश्यक साचलेले फॅट देखील कमी होतात. पण खूप लोक असे आहेत जे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू लागते. अशावेळी वजन कमी करणारा समज खोटा वाटू लागतो. पण उपवासादरम्यान (fast) तुम्ही जर अनहेल्दी आहाराचे सेवनक केल्यास त्याचा शरिरावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कित्येकदा लोक भूक लागल्यावर सॅन्क्स किंवा तळलेले पदार्थ खाण्याची चूक करतात, ज्यामुळे वजन वाढते. जर उपवास कताना वजन कमी कमी होत नसेल तर तुमचे नक्की काय चूकतेय ज्यामुळे तुमचे वजन वाढते हे जाणून घेऊ या
उपवसादरम्यान या चूका करू नका
गोड पदार्थांपासून लांब राहा
कित्येक लोक उपवासादरम्यान गोड पदार्थ खातात. गोड पदार्थ खाल्यामुळे उर्जा मिळते पण असे कारण आहे ज्यामुळे तुमचे वजन वाढते. तुम्ही जितके कमी साखर खाता तितके तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहते.
तळलेले पदार्थ खाणे
उपवासा दरम्यान लोक तळलेले बटाटा किंवा बटाट्याचे चिप्स आवडीने खातात. पण त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे तुम्ही बटाट्याचे बेक केलेल पदार्थांचा समावेश केल्यास तुमचे वजन वाढणार नाही. बेक केल्यामुळे बटाट्यातील फॅट नष्ट होतात जे अधिक टेस्टी आणि हेल्दी असतात.
हेल्दी फॅटकडे दुर्लक्ष करणे
उपवासाच्या काळात जर फॅट यूक्त डाएट खातो तेव्हा ते वजन वाढण्याचा धोका असतो त्यामुळे तुम्ही आक्रोड, फ्रेक्स सीड, सनफ्लॉवर सीड असे हेल्दी पर्याय भरपूर गोष्टी समाविष्ट करा. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही आणि तुम्ही हेल्दी देखील राहाल.
नेहमी जेवणाकडे लक्ष
जर तुम्ही नेहमी खाण्याचा विचार करत असाल , अजून काय खावे, काय नको त्यामुळे तुम्हाला काहीतर खाण्याची क्रेव्हिंग वाढू शकते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. उपवासाआधी ठरवा की काय खायचे आहे. हेल्दी पदार्थ, फळे किंवा ड्रायफ्रुट्स ई. गोष्टींचा डाएटमध्ये समाविष्ट करा.