बेडरुमच्या रंगाचा सेक्स लाइफशी संबंध, कसा ते जाणून घ्या?

जांभळ्या रंगाचा होतो सेक्स लाइफवर परिणाम?
बेडरुमच्या रंगाचा सेक्स लाइफशी संबंध, कसा ते जाणून घ्या?
Updated on

कोणत्याही रंगाचा सेक्स लाईफवर (intimatelife) परिणाम होतो का? हा प्रश्न खरंतर बुचकळ्यात पाडणारा आहे. पण हो. आपल्या आजूबाजुच्या वातावरणाचा परिणाम जसा आपल्या शरीरावर किंवा मनावर होत असतो. तसाच तो आपल्या सेक्स लाईफवरही होत असतो. याविषयी नुकताच एक अभ्यास करण्यात आला असून रंगांचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो. तसंच जांभळ्या रंगामुळे कामुकतेची भावना वाढू शकते असंही समोर आलं आहे. (does-purple-shade-increase-the-intimate-life)

घर सजवताना आपण प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार करत असतो. अगदी घरात कोणतं फर्निचर असावं इथपासून कोणती वस्तू कुठे ठेवली पाहिजे इथपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करत असतो. या कामात काही जण इंटेरिअर डिझायनर्सचादेखील सल्ला घेतात. विशेष म्हणजे घराला रंग देताना काही नियम फॉलो केले जातात. जसं की, स्वयंपाक घरात प्रकाश यावा यासाठी ब्राईट कलर, हॉलमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करणारा रंग आणि शांत झोप लागावी म्हणून बेडरुममध्ये गडद रंग असे काही पर्याय कायमच सुचवण्यात येता. परंतु, या प्रत्येक रंगामागे एक खास कारण असतं. प्रत्येक रंगाचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे रंगांची योग्य निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्येच जांभळा किंवा तत्सम रंगाच्या जवळपास जाणाऱ्या कलरचा परिणाम आपल्या सेक्स लाईफवरही होत असतो. हा परिणाम नेमका कसा होते ते पाहुयात.

बेडरुमच्या रंगाचा सेक्स लाइफशी संबंध, कसा ते जाणून घ्या?
सावत्र आईने कधीही करुन नयेत 'या' तीन गोष्टी; नाहीतर...
बेडरुमच्या रंगाचा सेक्स लाइफशी संबंध, कसा ते जाणून घ्या?
वयात येणाऱ्या मुलींना 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!

खरंच जांभळ्या रंगाचा आहे का सेक्स लाईफशी संबंध

जांभळा रंग डोळ्यांना आकर्षित करणारा असल्यामुळे या रंगाने कामुकतेची भावना वाढते असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्यांच्या बेडरुमचा रंग जांभळा असतो त्यांची सेक्स लाईफ चांगली असते. तसंच या रंगामुळे व्यक्तीची विचार करण्याची क्षमता वाढते. परिणामी, त्याचा परिणाम मूडवरही होत असतो. विशेष म्हणजे अनेक ऑनलाइन साईट्सवर सेक्स टॉईजदेखील जांभळ्या रंगातच उपलब्ध असल्याचं दिसून येतं.

दरम्यान, जर बेडरुमचा रंग जांभळा नसेल किंवा तुम्हाला तो चेंज करायचा नसेल तर त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. भिंतींच्या रंगांऐवजी तुम्ही सोफा कवर, चादर, पडदे यांसाठी जांभळ्या रंगाची निवड करु शकता. तसंच पर्पल शेड्सच्या कॅण्डल्सदेखील रुममध्ये लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com