esakal | Back pain: पाठदुखीकडे दुर्लक्ष नको, असू शकतो गंभीर आजार
sakal

बोलून बातमी शोधा

Back-Pain

Back pain: पाठदुखीकडे दुर्लक्ष नको, असू शकतो गंभीर आजार

sakal_logo
By
दीनानाथ परब

पाठदुखी (Back pain) एक सामान्य त्रास आहे. प्रत्येकाला कधी न कधी पाठदुखीच्या त्रासातून जावे लागते. अनेक जण पाठदुखीकडे सामान्य त्रास समजून दुर्लक्ष करतात. पण भविष्यात पाठदुखीमुळे मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेकजण पाठदुखी आणि त्यातून होणाऱ्या त्रासामुळे काय गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, या बद्दल फार जागरुक नाहीयत.

कधी सुरु होतो त्रास

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाठदुखीचा त्रास युवावस्थेत वयाच्या २० व्या वर्षापासून सुरु होऊ शकतो. पण त्याचे योग्य निदान व्हायला साडेआठ वर्ष लागू शकतात. वेळीच उपचार केले नाहीत, तर पेशी खराब होऊ शकतात. इतकंच नाही, तर रोज काम करतानाही त्रास होऊ शकतो. पाठदुखीचा त्रास इतका भयंकर असतो की, पायात मोजे घालतानाही तुम्हाला वेदना होऊ शकतात.

हेही वाचा: Drug case: NCB कडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी

पाठदुखीकडे दुर्लक्ष करण्यामुळे होणारे नुकसान

रुग्ण अनेकदा पाठदुखीवर उपचार करण्याऐवजी वेदना कमी कशा होतील, त्यावर उपाय करतात. सततच्या पाठदुखीमुळे पेशींचेच नाही तर हाडाचेही नुकसान होऊ शकते. पाठदुखीच्या या त्रासाचा मानसिकतेवरही परिणाम होतो.

हेही वाचा: पुढच्या 3 तासात राज्यातील 'या' भागात गडगडाटासह मुसळधार

मणक्याच्या सांध्यांमध्ये त्रास असल्यास शरीराच्या खालच्या भागामध्ये दुखणे वाढते. डॉक्टरांच्या मते हे सायटिका सुद्धा असू शकते. अनेकदा लोकांना उपचार नसलेला हा आजार समजतच नाही. त्या शिवाय Axial spondyloarthritis आजाराचेही संकेत असू शकतात. या मध्ये सांध्यापासून सुरु होणारं दुखण शरीराच्या खालच्या भागापर्यंत पोहोचतं. डॉक्टरांच्या मते Axial spondyloarthritis आजाराबद्दल सुरुवातीला समजत नाही. एक्स रे मधुनचं या आजाराबद्दल माहिती मिळते.

loading image
go to top