esakal | Drug case: NCB कडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

gauri aryan khan

Drug case: NCB कडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कॉर्डीलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (drug case) अटकेत असलेला सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. काल आर्यनचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आता जामिनासाठी पुन्हा सत्र न्यायलयात (session court) अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान आता शाहरुख खानचा ड्रायव्हर राजेश मिश्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. शाहरुख खानचा ड्रायव्हर आज चौकशीसाठी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) कार्यालयात पोहोचला आहे.

एजन्सीने समन्स बजावल्यानंतर शाहरुख खानचा ड्रायव्हर एनसीबीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चट आणि मुनमुन धामेचा या तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका; BYJUs ने थांबवल्या जाहिराती

आर्यन खानसोबत अन्य पाच जणांना त्याच तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मुनमुन धामेचासह आणखी एका महिला आरोपीला भायखळा महिला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा: Lakhimpur: देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून - संजय राऊत

आर्यन खान आणि अन्य आरोपींना क्वारंटाइन कोठडीत ठेवण्यात आले आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, प्रतीक गब्बा आणि अन्य एक जण कॉर्डिलिया क्रूझवर पार्टीसाठी एकत्र गेले होते. शनिवारी एनसीबीने याच पार्टीवर छापा मारुन आठ जणांना अटक केली होती. मन्नतवरुन मर्सिडीज कारमधून तिघे एकत्र गेले होते.

loading image
go to top