esakal | Monsoon Update : पुढच्या 3 तासात राज्यातील 'या' भागात गडगडाटासह मुसळधार; हवामानचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update

मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात अधून मधून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.

पुढच्या 3 तासात राज्यातील 'या' भागात गडगडाटासह मुसळधार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

यंदा परतीचा पाऊसामुळे राज्यातील काही प्रदेशात मुसळधार ते अतिमुसधार पाऊस सुरु आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात अधून मधून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह संपूर्ण राज्यात पाऊस चालु असल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. ऐन रोपांच्या वाढीवर या पावसाचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान आजही राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य, मराठवाडा भाग, पालघर, पुणे आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात मध्यम ते तीव्र ढग दिसत असून पुढील 3-4 तासात गडहडाटासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा: पत्नीचे चारित्र्य अन् अपत्याच्या संशयावरून 'आरव'चा खून

दरम्यान, पुढील काही तास या भागांतीस लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील या भागात पावसाचे ढग असणार आहेत. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेत महत्वाच्या कामासांठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: "...म्हणून त्यांना सोडलं"; NCBचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर

ऑक्टोबर हीट

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या मराठवाड्याला मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. मात्र या दरम्यान, पावसाळा संपत आल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आकाश पूर्ण मोकळं होत जात. हवादेखील कोरडी होते. वातावरणात धुलीकणही खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर येतात. त्यामुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होते. या दोन्ही प्रकराच्या उष्णतेमुळे वातावरणात अचानक उकाडा जाणवायला लागतो. यालाच ऑक्टोबर हीट असे म्हणतात.

loading image
go to top