esakal | Dry Shaving ने त्वचेला होते हे नुकसान चुकूनही या चुका करू नका

बोलून बातमी शोधा

Dry Shaving ने  त्वचेला होते हे नुकसान चुकूनही या चुका करू नका
Dry Shaving ने त्वचेला होते हे नुकसान चुकूनही या चुका करू नका
sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : तुम्हाला अनावश्यक असणारे शरीरावरील केस तुम्ही काढत असाल तर एका गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ड्राय सेविंग अजिबात करू नका यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होते.अंगावर असलेले नको असलेले केस आपण काढण्यासाठी अनेक उपाययोजना करतो परंतु सर्वात जलद आणि वेदनाविरहित पद्धत म्हणजे सेविंग होय. यामुळे आपण कोणत्याही वेदना शिवाय काही अल्प वेळेतच नको असलेले केस काढून टाकतो.

स्वच्छ आणि सुरक्षित त्वचेसाठी सेविंग करणे चांगले आहे परंतु आपणास तेव्हाच लाभदायक ठरते जेव्हा आपण योग्य पद्धतीने सेविंग करतो. अनेक वेळा गडबडीमध्ये आपण ड्राय सेविंग करतो. कोणतेही सेविंग क्रीम अथवा अन्य लुब्रिकँट शिवाय आपण अशा वेळी सेविंग करतो. यामध्ये तुमचा वेळ वाचत असला तरी ही गोष्ट तुमच्या त्वचेसाठी अजिबात सुरक्षित नाही. यामुळे आपल्या केवळ त्वचेला नव्हे तर अनेक पद्धतीने मोठे नुकसान होते आणि त्याचे परिणाम आपल्याला कालांतराने दिसतात. याठिकाणी ड्राय सेविंग मध्ये कशा पद्धतीने आपले नुकसान होते याची माहिती देणार आहोत.

त्वच्या बनते अधिक कोरडी

नको असलेले केस आपण सेविंग द्वारे काढत असताना या पद्धतीत एक्सफोलीएट सुद्धा होते. यामुळे आपल्या त्वचेवरील मृत पेशी बाजूला होतात. परंतु दुसऱ्या बाजूस सेविंग पद्धतीमध्ये आपली त्याच्या अधिक कोरडी बनते. यामुळेच आपल्याला अनेक वेळा खाज सुटणे अथवा भगभगने असा त्रास सेविंग नंतर होतो. अशा स्थितीमध्ये ड्राय सेविंग करणे चांगले नाही. वास्तविक सेविंग क्रीम आणि जेल त्वचेला मऊपणा आणतात त्याच बरोबर आफ्टर शेव मॉइश्चरायझर वापरणेआवश्‍यक असते. आपल्या त्वचेला स्वस्थ आणि मोय्स्चरायझर ठेवण्यासाठी ड्राय सेविंग करण्यापासून टाळा.

त्वचा होऊ शकते स्क्रॅप

सेविंग करण्यापूर्वी आपल्या त्वचेवर क्रीम या कंडिशनरचा वापर केला जातो. हे आपल्या त्वचेला लुब्रिकँट प्रमाणे काम करतात. त्यामुळे आपली त्वचा अधिक मऊ बनते त्याचबरोबर त्वचेवर एक संरक्षित थर तयार करण्याचे काम हे क्रीम करत असतात. यामुळे त्वचेला थेट ब्लेड चा संपर्क येत नाही. परंतु आपण जर ड्राय सेविंग करत असाल तर ब्लेडचा थेट संपर्क त्वचेला येतो यामुळे आपले स्क्रीन स्क्रॅप होते.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.