‘हेलिकॉप्टर’ पालक

आपल्या मुलांची अति-काळजी करणारे असे पालक एखाद्या हेलिकॉप्टरप्रमाणे आपल्या मुलांवर चक्क घिरट्या घालत असतात!
Dr Sunil Godbole writes about parents Overparenting
Dr Sunil Godbole writes about parents Overparentingsakal

डॉ. सुनील गोडबोले

एक तीन-चार वर्षांचा चिमुरडा बागेत मातीत खेळू पाहत होता आणि त्याची आई त्याला सारखे उचलून घेत होती. तेवढेच नाही तर लगेच सॅनिटायझरने हात पुसूनही घेत होती. बहुधा मातीत खेळण्याने होणारे दुष्परिणाम गुगलवर वाचलेही असावेत! कारण जेमतेम पाच-दहा मिनिटांत ती चिंतातूर आई रडवेल्या मुलाला घेऊन बागेतून बाहेरही पडली. असे अतिरेकी आई-वडील सध्या जागोजागी दिसू लागलेत.

अतिपालकत्व/ हेलिकॉप्टर पालकत्व

प्रश्न सध्याचा असला, तरी याचं चपखल वर्णन इसवी सन १९६९ मध्ये डॉ. हेम ग्नॉट यांनी केलंय : आपल्या मुलांची अति-काळजी करणारे असे पालक एखाद्या हेलिकॉप्टरप्रमाणे आपल्या मुलांवर चक्क घिरट्या घालत असतात!

लक्षणे

  • मुलाच्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सारखी लुडबूड.

  • मुलाला स्वतः कुठलीही गोष्ट करू न देता त्याची सेवा करणे.

  • मुलांचे गृहपाठ करणे, त्यांच्या बुटांची नाडी बांधणे इत्यादी गोष्टी असे पालक आनंदाने करतात.

  • शाळेतील, मित्रांमधली भांडणेसुद्धा या मुलांचे पालक सोडवायला जातात.

दुष्परिणाम

  • अशा पालकांची मुले भित्री, आव्हान टाळणारी, परावलंबी बनतात.

  • या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी पडतो, ती पटकन् निराश होतात.

  • अशा छत्राखाली वाढणाऱ्या मुलांमध्ये निर्णयक्षमता कमी असते.

  • अतिपालकत्वामुळे - मुले आणि त्यांचे पालक- कुणीच आनंदी नसते.

टाळता कसे येईल?

  • मुलांची ‘सेवा’ करू नका, मुलांना ‘आधार’ द्या. उदाहरणार्थ, गृहपाठातले गणित सोडवून देऊ नका, त्यासाठीची ‘ट्रिक’ सांगा.

  • मुले भांड‌णे/ समस्या घेऊन घरी आली, तर वेळ देऊन फक्त ‘ऐका.’

  • पर्याय शोधायला सांगा, उत्तर मुले शोधतील.

  • मुलांना प्रयोग करू देत, धडपडू देत! वेळ पडली तर ‘आधार’ नक्की द्या.

  • थोडक्यात मुलांचे बोन्साय करण्यापेक्षा, वाढणाऱ्या वेलीला आधार देण्याचे काम करूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com