हॅप्पी पेरेंटिंग : आत्मविश्वास आणि अहंकार

परवा एकाच वेळी एकच काम दोन मुलांना (वय अंदाजे १० वर्षं) सांगितलं. ‘काम करू शकाल का?’ विचारल्यावर एकानं नजरेला नजर देऊन सहज सांगितलं - ‘हो! मी करू शकतो.’
Happy Prenting
Happy PrentingSakal

परवा एकाच वेळी एकच काम दोन मुलांना (वय अंदाजे १० वर्षं) सांगितलं. ‘काम करू शकाल का?’ विचारल्यावर एकानं नजरेला नजर देऊन सहज सांगितलं - ‘हो! मी करू शकतो.’ आणि दुसरा त्याहूनही सहजतेनं पटकन् म्हणाला, ‘हॅऽऽऽ! हे काम माझ्याइतकं चांगलं दुसरा कुणी करूच शकणार नाही.’

दुर्दैवानं ते काम दोघांनाही पूर्ण करता आलं नाही. पहिला मान खाली घालून म्हणाला, ‘‘मला नाही जमत. मला थोडी मदत करा.’’ दुसरा चिडचिडत उद्गारला, ‘‘मी तर बरोबरच केलं आहे, त्या गोष्टीतच काहीतरी गडबड आहे.’’

पालक मित्रांनो, अशी दोन्ही प्रकारची मुलं सध्या सहज बघायला मिळतात. पहिला योग्य आत्मविश्वास असलेला, तर दुसरा गर्विष्ठ किंवा अहंकार बाळगून असलेला. खरंच आत्मविश्वास आणि गर्विष्ठपणाच्या मध्ये सीमारेषा फार धूसर आहे. हा गर्व किंवा अहंकार येतो कुठून?

प्रेमळ पालकत्व

अगदी लहान वयापासून मुलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीचे अतिरेकी कौतुक करणारे पालक मुलांच्या ‘मी’ला फुगवत असतात.

स्क्रीन, टीव्हीचा अतिरेक

दुर्दैवाने लोकप्रियतेसाठी ‘हिरो’सुद्धा थोडासा अहंकारी, आगाऊ, आपलंच खरं करणारा, इतरांना तुच्छ लेखणारा दाखवला जातो. स्पंजप्रमाणे शोषून घेणारी मुलं त्याचीच अजाणता कॉपी करतात.

कायम ताणाखाली वावरणं

बराच वेळ शाळेत, घरी, मैदानावर अनेक प्रकारच्या ताणतणावाला मुलं सामोरी जात असतात. अशा वेळेस बचावात्मक कृती म्हणून मुलं ‘मीच शहाणा’चा आव आणतात आणि तणावाशी सामना करतात.

नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न

अगदी दोन-अडीच वर्षांच्या मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला आजूबाजूच्यांवर सत्ता गाजवावीशी वाटत असते. हीच भावना मग ‘अहंकारात’ रूपांतरित होते. अर्थातच अहंकारामुळे नुकसानच होतं. मित्र दूर होतात, शिक्षक एकतर ओरडतात किंवा चक्क दुर्लक्ष करतात. समाज, नातेवाईक नावं ठेवू लागतात. शिस्तबद्ध, संयमी, कालबद्ध प्रयत्नांनी आपण मुलांच्या गर्वाचं घर खाली आणू शकतो.

  • गर्व/अहंकार चुकीचाच आहे हे स्पष्टपणे सांगावं. फक्त सगळ्यांच्या समोर न सांगता एकांतात, शांतपणे, धीरानं सांगावं.

  • मुलं आपल्या अहंकाराची तर प्रतिबिंब नाहीत ना, याची खात्री करा.

  • काही वेळा मुलांचा अहंकार आपल्या मोठ्यांच्या अहंकाराला धक्का देतो. अशा वेळेस आपण मोठ्यांनी समजूतदारपणानं थोडं मागं येऊन चक्क सोडून देणं उपयोगाचं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com