हॅप्पी पेरेंटिग : सहल हवी अर्थपूर्ण

नुकतेच एक नवीन जनरेशन - झेडचे पालक भेटले. मुलाला घेऊन पन्हाळगडावर फिरायला गेले होते.
Family Trip
Family TripSakal
Summary

नुकतेच एक नवीन जनरेशन - झेडचे पालक भेटले. मुलाला घेऊन पन्हाळगडावर फिरायला गेले होते.

नुकतेच एक नवीन जनरेशन - झेडचे पालक भेटले. मुलाला घेऊन पन्हाळगडावर फिरायला गेले होते. मुलाने तिथले हॉटेल, खाणेपिणे, विविध खेळ व पॉइंट्सची छान माहिती सांगितली; पण पन्हाळगडाचा इतिहास मात्र माहीत नव्हता.

जशी उन्हाळ्याची सुटी येते, तसे बरेच पालक मुलांबरोबर फिरायला जायचे प्लॅन आखायला लागतात. मग त्यात ‘रिसॉर्ट’ कसा आहे, तिथे काय काय सोयी आहेत, मुलांच्या वयानुसार खेळ आहेत ना, जातो त्या ठिकाणचे पिकनिक पॉइंट्स इत्यादी माहिती घेतली जाते. ‘गुगल रिव्ह्यू’ घेतला जातो.

प्रत्यक्ष तिथे गेल्यावर ‘तीन’ अतिमहत्वाच्या गोष्टींची खात्री केली जाते - खोलीत एसी चालू आहे का, टीव्ही कसा चालू होतो आणि वायफाय आहे की नाही? उन्हाळा खूप आहे म्हणत लोळण्यात, टीव्ही बघत किंवा मोबाईल खेळत दिवस संपतो. जमल्यास सनराईज किंवा सनसेट पॉइंट्सचे फोटो काढले जातात, वेगवेगळे ॲडव्हेन्चर स्पोर्ट्‌स एन्जॉय केले जातात! अशा रितीने ‘पिकनिक’ छान साजरी होते? पण हे सगळे तर आपल्या शहरातही शक्य होते? मग पिकनिक कशासाठी?

1) आपल्या मुलांना नवीन, अविकरणीय अनुभव देण्यासाठी

2) नवीन गावाची, भौगोलिक बदलांची ओळख करून देण्यासाठी. उदाहरणार्थ, कोकणात गेल्यावर तिथल्या नारळाच्या-पोफळीच्या बागा पुण्या-मुंबईपेक्षा कशा वेगळ्या आहेत हे समजले पाहिजे.

3) जिथे जातो तिथल्या माणसांना जवळून पाहण्यासाठी, त्यांची संस्कृती, चालीरिती समजून घेण्यासाठी. मग त्यात विदर्भ, मराठवाड्याची खास भाषाशैली जाणवली पाहिजे किंवा गुजरात-राजस्थानातील भाषेचा अनुभवही मिळाला पाहिजे.

4) ज्या प्रदेशात जाऊ त्या प्रदेशातील खाद्यसंस्कृतीही कळली पाहिजे. राजस्थानात जाऊन पिझ्झा-बर्गर खाण्यापेक्षा तिथल्या दालबाटीची चव चाखली पाहिजे. अर्थात हे सगळे मुलांचे पोट सांभाळून!

5) मुलांबरोबर फिरायला जाताना ‘ऑफीसचे फोन’ बंदच (किंवा मर्यादित वेळेत) हवेत. मुलांना फिरायला जाताना आई-वडिलांची जवळून ओळख होत असते.

6) सगळ्यात महत्त्वाचे जिथे जातो तिथला इतिहास समजून घेणे आणि मुलांना समजावून सांगणे. बऱ्याच वेळा आपल्याला इतिहास महत्त्वाचा वाटत नाही, भग्नावशेषांना आपण नाके मुरडतो; पण जशी आपल्या पूर्वीची पिढी आता ‘इतिहास’ बनलीय (!), तसे आपल्या पुढचा पिढीसाठी आपणही इतिहास बनणार आहोत! म्हणून ‘इतिहास’ नवीन पिढीला सांगायलाच पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com