वाहन चालवताना या गोष्टी पाळा! अपघात टाळा

दरवर्षी रस्ते अपघातात लाखो जीव जातात.
road accident
road accidentesakal
Summary

दरवर्षी रस्ते अपघातात लाखो जीव जातात.

दरवर्षी रस्ते अपघातात (Road Accident) लाखो जीव जातात. वाहने रस्त्यावर असतील तर अपघात होणे स्वाभाविक आहे. आपल्या थोड्याशा समजुतीने, अपघाताची शक्यता खूप कमी केली जाऊ शकते. अपघात टाळण्यासाठी वाहनचालकाने काही गोष्टींची खबरदारी घ्यावी. या 5 चुका कोणत्याही वाहनचालकाकडून (Driver) होऊ नयेत, यासाठी खबरदारी घ्या.

road accident
Google Map मुळे रस्त्यावरील अपघात, चालान कापण्यापासून वाचाल! जाणून घ्या फिचर्स

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे - चालकाने नेहमी काळजी घेतली पाहिजे की तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तर नाहीयेय ना. मद्यधुंद अवस्थेत चालकाचे हात-पाय नियंत्रणाबाहेर जातात. यामुळे अपघात होणे स्वाभाविक आहे. म्हणून दारू पिऊन गाडी चालवू नका.

झोपेत गाडी चालवणे - "दुर्घटना से देर भली" ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. अनेक वेळा आपल्याला थकवा किंवा रात्री गाडी चालवताना झोप येऊ लागते. अशावेळी झोप आल्यास वाहन बाजूला उभे करा. तसेच दुसरा ड्रायव्हर सोबत घ्या यामुळे आळीपाळीने विश्रांती घेणेही सोयीस्कर ठरते.

road accident
रेल्वे अपघात रोखणारे 'कवच' तंत्रज्ञान नेमकं काय?

ओव्हर स्पीड चालणे - अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे भरधाव वेगाने (ओव्हर स्पीड गाडी चालवणे हेही आहे. या ओव्हर स्पीडमुळे गाडी ब्रेकला लावल्यावर ज्या अंतरात थांबायला हवी, त्या अंतरात गाडी थांबू शकत नाही यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.

हवामानाच्या विरुद्ध वाहन चालविणे - अपघातांचे एक मुख्य कारण म्हणजे हवामान. पाऊस आणि दाट धुक्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. धुक्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने ब्रेक लावल्यावर समोरून येणाऱ्या वाहनालाही धक्का बसतो. त्यामुळे अधिक धुके आणि पावसात गाडी चालवली नाही तर बरे होईल.

नियमाविरुद्ध वाहन चालविणे - वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवा. लाल दिव्याचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. रोड साइन, ट्रॅफिक सिग्नल, लाइट सिग्नल आणि चौक ओलांडण्याचा मार्ग इ.सर्व गोष्टी लक्षात घेऊन वाहन चालवणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com