Dry Shampoo : ड्राय शॅम्पू म्हणजे काय? नेहमीच्या शॅम्पूपेक्षा कसा आहे वेगळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shampoo

Dry Shampoo : ड्राय शॅम्पू म्हणजे काय? नेहमीच्या शॅम्पूपेक्षा कसा आहे वेगळा

Dry Shampoo For Hair : अस्वच्छता अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे शरिरासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये केसांच्या (Hair) स्वच्छतेलाही महत्त्व आहे. त्यासाठी अनेकजण वेळोवेळी शॅम्पूचा वापर करतात.

हेही वाचा: Winter Hair Care: थंडीत केसांची अशी 'घ्या' काळजी; घरीच तयार करा तेल

केसांच्या स्वच्छतेसाठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. अनेकांना वेळेआभावी नियमित केस धुणे शक्य होत नाही. त्यामुळे केसांचे आरोग्य (Hair Care) बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला ड्राय शॅम्पूबद्दल (Shampoo) सांगणार आहोत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, हा ड्राय शॅम्पू म्हणजे काय? चला तर मग जाणून घेऊया सामान्य शॅम्पू आणि ड्राय शॅम्पूत नेमका फरक काय आहे. तसेच हा कसा वापरला जातो.

हेही वाचा: Rice Water Shampoo : कोरियन मुलींसारखे लांब केस हवेत? मग वापरा हा शॅम्पू

केस रोज धुणे, ब्लो-ड्रायिंग आणि स्टाइलिंगसाठी खूप वेळ लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी तुम्ही ड्राय शॅम्पूचा वापर करू शकता. तुम्हाला वेळे अभावी केसं धुणे जमत नसेल तर, तुमच्यासाठी ड्राय शॅम्पू उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा: केस गळतीने त्रस्त आहात? घरीच तयार करा आयुर्वेदिक शॅम्पू

ड्राय शॅम्पू म्हणजे काय? सामान्य शॅम्पूपेक्षा कसा आहे वेगळा?

ड्राय शॅम्पू हे असे उत्पादन आहे ज्याचा वापर तुम्ही पाण्याशिवाय करू शकता. याच्या वापरामुळे केसांमधील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. ड्राय शॅम्पूला हायब्रीड शाम्पू असेही म्हणतात. ड्राय शॅम्पू पावडर स्वरूपात उपलब्ध आहे.

बहुतेकदा याची निर्मिती कॉर्न स्टार्च किंवा तांदूळ स्टार्चपासून केली जाते. ड्राय शॅम्पू आणि टाईम शॅम्पूमध्ये छोटासा फरक आहे. तो म्हणजे ड्राय शॅम्पू पावडर स्वरूपात असतो आणि रेग्युलर शॅम्पू द्रव स्वरूपात असतो.

हेही वाचा: शॅम्पू मध्ये फक्त एका गोष्टीचा करा वापर; केस होतील काळेभोर

कसा काम करतो ड्राय शॅम्पू

केस रोज धुणे, ब्लो-ड्रायिंग आणि स्टाइलिंगसाठी खूप वेळ लागतो. इथेच ड्राय शॅम्पूची गरज भासू लागते. तुम्हीही केसांना वेळ देऊ शकत नसाल तर केस स्वच्छ करण्यासाठी ड्राय शॅम्पू हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. कोरड्या शैम्पूमध्ये तुमच्या केसांमधून तेल आणि घाम शोषण्यासाठी अल्कोहोल- किंवा स्टार्च-आधारित सक्रिय घटक असतात. बर्‍याच ड्राय शैम्पूमध्ये सुगंध देखील असतो, ज्यामुळे तुमच्या केसांना ताजे लूक मिळू शकतो आणि तुम्हाला फ्रेश वाटू शकते.

ड्राय शॅम्पूमध्ये केसांमधून तेल आणि घाम शोषण्यासाठी अल्कोहोल- किंवा स्टार्च-आधारित घटक समाविष्ट असतात. बर्‍याच ड्राय शॅम्पूमध्ये सुगंधदेखील असतो, ज्यामुळे तुमच्या केस ताजे दिसण्यास मदत होते.

ड्राय शॅम्पूचा दररोज वापर योग्य आहे का?

ड्राय शॅम्पूचे अनेक फायदे असले तरी, त्याचा जास्त वापर केल्याने समस्याही निर्माण होऊ शकतात. याच्या अधिक वापरामुळे केसांची वाढ थांबू शकते. त्यामुळे दोनदा केस धुतल्यानंतर एकदाच ड्राय शॅम्पूचा वापर करणे उचित ठरू शकते.

टॅग्स :hairHair Careshampoo