Egg Manchurian Recipe: भूर्जी, ऑमलेट, बॉईल एगपेक्षाही भन्नाट आहे एग मंच्युरियन; रेसिपी पण एकदम सोप्पीय

मुलांना अंड खायला घालण्याचा भन्नाट प्रकार; रेसिपी नोट करून घ्या
Egg Manchurian Recipe:
Egg Manchurian Recipe: esakal

Egg Machurian Recipe: अंड्याचे अनेक पदार्थ तुम्ही आजवर खाल्ले असतील. सध्या ट्रेंडमध्ये हाल्फ बॉईल एगही आहे. ज्यात लोक अंड्याचा पांढरा भाग फ्राय करतात अन् पिवळा भाग तसाच खातात. पण त्याचे परंपरागत पदार्थ म्हणजे उकडलेलं अंडे, ऑमलेट, भुर्जी होय. 

पण आज आम्ही तुम्हाला जो पदार्थ सांगणार आहोत तो जरा वेगळा आहे. आजवर तुम्ही कोबी, मशरूमची मंच्युरियन खाल्ले असेल तर आज अंड्याचे मंच्युरियन कसे बनवायचे ते पाहुयात.  

Egg Manchurian Recipe:
World Egg Day : अंडी खाणे आरोग्यासाठी लाभदायी का आहे ? जाणून घ्या अंडी खाण्याचे ‘हे’ फायदे

अनेकांना अंडी आवडतात. लहान मुलांसाठीही अंडी खाणे पौष्टीक असते. पण सतत उकडलेली अंडी त्यांनाही आवडेनाशी होतात. त्यामुळे हे अंड्याचे मंच्युरियन काहीतरी वेगळं होईल आणि मुलंही अंडी खायला लागतील.  

साहीत्य –

5 उकडलेली अंडी, अर्धी वाटी मैदा, व्हिनेगर 2 चमचे, सोया सॉस 2 चमचे, लाल मिरची केचप, 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, तेल आवश्यकतेनुसार. (Egg Recipes)

कृती

  • हे मंचुरियन यासाठी सर्वात आधी अंडी उकडून घ्या. यासाठी एका पातेल्यात २ ग्लास पाणी गरम करून त्यात अंडी टाका.  अंडी उकडून झाली की साल काढून एका भांड्यात काढा.

  • आता अंडी कापून त्यातील पिवळा भाग वेगळा करा. आणि पांढऱ्या भागाचे बारीक तुकडे करा.

  • आता या तुकड्यांमध्ये पीठ, मीठ आणि तिखट चवीनुसार घाला आणि हाताने चांगले मॅश करा. मॅश केल्यानंतर त्याचे छोटे मंचुरियन गोळे बनवा.

Egg Manchurian Recipe:
Egg Bread : ब्रेकफास्टमध्ये ब्रेड अंडी एकत्र खाताय? हे कॉम्बिनेशन हेल्दी आहे काय? वाचा सविस्तर
  • यानंतर एका भांड्यात 3 चमचे मैदा आणि 2 कच्ची अंडी फोडून घाला. नीट मिक्स करून मग त्यात सर्व मंचुरियन गोळे टाका. हे गोळे आता तळून घ्या.

  • त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात तयार मंचुरियन गोळे सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर एक पॅन घ्या आणि त्यात थोडे तेल गरम करा.

  • नंतर चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदे तेलात टाकून हलके तळून घ्या. यानंतर लाल मिरची केचप, सोया सॉस, व्हिनेगर घालून मिक्स करा.

  • यानंतर मंचुरियन गोळे घालून चांगले मिक्स करा. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढा आणि तीळ घालून सजवा. एग मंचुरियन तयार आहे, त्याचा आस्वाद घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com