National Egg Day 2024 : अंडी खाणे आरोग्यासाठी लाभदायी का आहे ? जाणून घ्या अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

National Egg Day 2024 : अंड्याचे सेवन केल्याने शरीराचे योग्य पोषण होण्यास मदत होते.
National Egg Day 2024
National Egg Day 2024 esakal

National Egg Day 2024 : आपले आरोग्य निरोगी रहावे यासाठी आपण अनेक पौष्टिक घटकांचा आहारात समावेश करतो. निरोगी आरोग्यासाठी कर्बोदके, पोषकतत्वे आणि जीवनसत्वांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. अनेकांच्या आहारात अंड्यांचा समावेश असतो. नाश्त्यामध्ये अंडी खाणे किंवा अंड्याचे ऑम्लेट खाणे हा आपल्यातील कित्येकांच्या आयुष्याचा भाग झाला आहे.

अंड्याचे सेवन केल्याने शरिराचे योग्य पोषण होण्यास मदत होते. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात. जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि मानसिक विकासासाठी महत्वाचे ठरतात. आज राष्ट्रीय अंडी दिन (National Egg Day 2024) आहे, त्यानिमित्ताने आज आपण अंडी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे ? आणि अंडी खाण्याचे फायदे कोणते आहेत ? ते आपण जाणून घेणार आहोत.

अंडी खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर का आहे ?

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. या पोषतत्वांसोबतच अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, लोह आणि जीवनसत्वांचा समावेश आढळून येतो. प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्याकडे पाहिले जाते. अंड्यामध्ये A, B6,B12 इत्यादी व्हिटॅमिन्स आढळून येतात.

National Egg Day 2024
Egg Benefits for Weight Loss : अंड खाणार वजन कमी होणार!

या व्हिटॅमिन्समुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. अंड्याच्या वरील पांढऱ्या भागामध्ये कॅल्शिअमचे सर्वाधिक प्रमाण आढळून येते. त्यामुळे, ज्यांना कॅल्शिअमची कमतरता आहे, अशा लोकांना अंड्याचा हा पांढरा भाग खाण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात. अंड्यामध्ये असलेले सेलिनियम शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. या सर्व कारणांमुळे, अंडी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

अंडी खाण्याचे फायदे कोणते ?

प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. यासोबतच प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्यांचा आहारात समावेश केला जातो. अंड्यामध्ये प्रथिनांचे मुबलक प्रमाण असल्यामुळे शरीरातील पेशींची दुरूस्ती आणि नवीन पेशी निर्माण करण्यासाठी ही प्रथिने आपल्याला मदत करतात.

मांसपेशींसाठी लाभदायी

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रथिने आणि अमिनो अ‍ॅसिड्स मुबलक प्रमाणात असतात. हे पोषक घटक आपल्या शरीरातील मांसपेशी तयार करण्यास मदत करतात. अंड्याचे सेवन केल्याने शरीरातील स्नायू मजबूत राहण्यास मदत मिळू शकते.

खरं तर या कारणामुळे जिममध्ये, व्यायामशाळेत दररोज अंडी खाण्याचा सल्ला ही दिला जातो. अंडी खाल्ल्यामुळे स्नायूंना फायदा होतो.

National Egg Day 2024
Egg White कि Egg Yolk अंड्याचा नेमका कोणता भाग आरोग्यासाठी चांगला?

डोळ्यांसाठी फायदेशीर

अंडी उकडून खाल्ल्याने आपल्या डोळ्यांनाही फायदा होतो. अंड्यामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे डोळ्यांशी संबंधित असलेल्या समस्या टाळण्यास मदत होते. त्यामुळे, डोळ्यांची समस्या असणाऱ्यांनी आहारात अंड्यांचा जरूर समावेश करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com