

Mandangad to Chiplun journey
Sakal
पद्मा शिपूरकर
मी सहावी-सातवीत असेन तेव्हाची गोष्ट. वय साधारण बारा-तेरा वर्षे. दिवाळी किंवा मे महिन्याची सुट्टी लागली, की मी चिपळूणला माझ्या मोठ्या ताईकडे जाण्यासाठी वडिलांकडे हट्ट करायचे. मग एकटीला कशी पाठवणार, हा प्रश्न वडिलांना पडत असे. ‘मी एकटी जाईन. मी नाही घाबरत,’ असं मी धीटपणे सांगायचे. मग वडील रत्नागिरीला जाणारे कोणी ओळखीचे आहेत का, याचा शोध घ्यायचे. असं कोणी ओळखीचं भेटलं, की वडील मला रत्नागिरीच्या गाडीत बसवायला यायचे आणि मग त्या ओळखीच्या गृहस्थांची आणि माझी ओळख करून द्यायचे.