New Year's Resolution : नवे संकल्प आणि साध्य

नवीन वर्ष सुरू झाल्यावर आरोग्यासंदर्भात संकल्प करणे सहजसाधारण झाले आहे.
end of 2023 new year beginning 2024 new resolution
end of 2023 new year beginning 2024 new resolutionSakal

- गौरी शिंगोटे

नवीन वर्ष सुरू झाल्यावर आरोग्यासंदर्भात संकल्प करणे सहजसाधारण झाले आहे. योग्य दृष्टिकोन ठेवून योग्य पावले उचलल्यास नवीन वर्षातील सर्व ‘आरोग्यसंकल्प’ सहजसाध्य होऊ शकतात.

वास्तववादी, विशिष्ट उद्दिष्टे

‘सकस खा व निरोगी राहा’ असे सर्वसामान्य उद्दिष्ट न ठेवता प्रत्येक जेवणात कमीतकमी एक भाग फळे व भाजी यांसारखे विशिष्ट उद्दिष्ट ठेवावे. आपल्या उद्दिष्टांची आटोपशीर भागात विभागणी करा. उदा - तुमचा संकल्प ‘अधिक पाणी पिण्याचा’ असेल तर सध्याचे प्रमाण मोजा. हळूहळू प्रमाण वाढवून आपले ध्येय साध्य करा.

तंत्रज्ञान वापरा

स्मार्टफोनमधील अॅप्सचा आरोग्य किंवा पाण्याचे सेवन मोजण्यास उपयोग होतो. आपले आरोग्यमापन करणारे ‘स्मार्टवॉच’ किंवा ‘फिटनेस बॅंड’ वापरा.

नियमित व्यायामास प्राधान्य

नियमित व्यायामासाठी विशेष प्राधान्य देऊन दिनक्रम ठरवा. आवडीनुसार व्यायाम ठरवा. नृत्य, योग, ट्रेकिंग असे कोणतेही, ज्याची आवड व सातत्य राहील.

जागरूकतेने खाण्याची सवय

सावकाश व आस्वाद घेत खाण्याची सवय लावा. यामुळे पोट भरल्याची जाणीव समजून येते व जास्त खाणे थांबते. दुसऱ्यांदा वाढून घेण्यापूर्वी खरंच भूक आहे की सवयीनुसार खाताय याचा क्षणभर विचार करा.

आधार व जबाबदारी

मित्राला किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला आपला संकल्प सांगा. त्यामुळे तुमची जबाबदारी वाढेल व त्याचा आधार, प्रोत्साहन मिळेल.

ध्येय गाठण्याची संधी

एखादे वेळेस ध्येय साध्य न झाल्यास हताश न होता ध्येय गाठण्याची संधी शोधा. छोटे छोटे, सलग व सकारात्मक बदल तुमच्या एकंदर निरोगीपणात नक्कीच सुधारणा करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com