Erectile Dysfunction | अगदी कमी वयातील तरुणांमध्ये का दिसत आहे नपुंसकतेची समस्या ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Erectile Dysfunction

Erectile Dysfunction : अगदी कमी वयातील तरुणांमध्ये का दिसत आहे नपुंसकतेची समस्या ?

मुंबई : आजकाल Erectile Dysfunctionची कमी वयातील तरुणांना जाणवू लागली आहे. याचा परिणाम म्हणून वैवाहिक नात्यात अस्थिरता येते. या समस्येची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे.

सध्याच्या काळात २० ते २९ वर्षे वयोगटातील ८ टक्के पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या आहे. ३० ते ३९ वयोगटातील ११ टक्के पुरूषा या समस्येने ग्रस्त आहेत. त्यामुळे विशीपंचविशीतच तरुणांना नपुंसकतेला सामोरे जावे लागत आहे. हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते ?

हेही वाचा: Long Distance Relationship : तुम्ही देशात, जोडीदार परदेशात; शरीरसुख कसे मिळवाल ?

इरेक्टाइल डिस्फंक्शनची लक्षणे काय आहेत ?

१) इरेक्शन येण्यात अडचणी

२) कामवासना कमी होते

३) आत्मविश्वास कमी होतो

४)  न्यूनगंड

५) वैवाहित नात्यात दुरावा येणे

काही विशिष्ट हार्मोन्सची पातळी अनियंत्रित राहिल्यास नपुंसकत्व येऊ शकते. यापैकी, टेस्टोस्टेरॉन. या हार्मोनची पातळी कमी झाल्याने लैंगिक इच्छा कमी होते व नपुंसकत्व येते. त्याचप्रमाणे, प्रोलॅक्टिन हार्मोनची पातळी वाढल्यामुळे देखील नपुंसकत्व येते. थायरॉइड कमी-जास्त झाल्यानेही असते.

हेही वाचा: Autistic Child : मुलांच्या साध्या वाटणाऱ्या या सवयी असू शकतात 'स्वमग्नते'ची लक्षणे

मधुमेहाचा तुमच्या यौन उत्तेजनेवर आणि ताठरतेवर प्रभाव पडतो. मधुमेहामुळे वाढलेली ब्लड शुगर लेव्हल शरीरातील रक्त वाहिन्यांना हानी पोहोचवते.

मेंदू हा लैंगिक संकेत देणारा सर्वात मोठा अवयव असतो. लैंगिक इच्छा आणि उत्कंठा मेंदूमधून सुरू होते. मेंदूतील रसायनांच्या असंतुलनामुळे ज्या लोकांना नैराश्य आहे त्यांची लैंगिक इच्छा कमी असू शकते.

धूम्रपानाचे व्यसन असल्यासु तुम्ही सहजपणे इरेक्टाइल डिसफंक्शनला बळी पडू शकता. सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेले निकोटीन शरीरातील रक्ताभिसरणावर दुष्परिणाम करते.

२० वर्षे वयोगटातील अनेक तरुणांना सेक्स परफॉर्मन्सबद्दल चिंता वाटते. अतिताणामुळेही लैंगिक संबंधांवर प्रभाव पडतो.

टॅग्स :Relationship Tips