Eucalyptus Oil Benefits : पायाला निलगिरी तेल लावा अन् चमत्कार बघा!  

अनेक गुणधर्मांनी संपन्न असे निलगिरी तेल आहे
Eucalyptus Oil
Eucalyptus Oil esakal

अनेक प्रकारचे तेल आहेत ज्याचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी तसेच आरोग्यासाठी केला जातो. पण, एक विशिष्ठ प्रकारचे तेल आहे जे तूमच्या प्रत्येक समस्येवर फायदेशीर ठरू शकते. त्या तेलाचे नाव आहे, निलगिरी तेल.

निलगिरीच्या तेलामध्ये जिवाणूरोधक, कवक रोधक आणि आणि रोग प्रतिबंधक तसेच अँटिव्हायरस, सुज, अंगदुखी आणि सर्दी खोकला यावर उपयुक्त ठरणारे गुण आहेत. जे की अशा समस्यांवर इलाज करणाऱ्या औषधांसाठी चांगले घटक मानले जातात. याच तेलाचे काही आश्चर्यचकीत करणारे फायदे जाणून घेऊयात.

Eucalyptus Oil
PM Modi's Mother : PM नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

हिवाळ्यातील समस्यांसाठी निलगिरीचे तेल लाभदायक आहे. हे तेल सर्दी, पडसं, खोकला, नाक वाहत राहणे, गळ्यामध्ये होणारी खिचखिच, अस्थमा, ब्रोंकाइटिस आणि साईंसायटीसच्या इलाजासाठी मदत करते.

प्रवास झाल्याने किंवा जास्त चालल्याने पाय खूप सुजतात. अशावेळी झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यावर नीलगिरीच्या तेलाचा मसाज करावा.याने सुज कमी येते आणि दुखणेही कमी होते.

ज्यांना झोप येत नाही, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी निलगीरी तेल एखाद्या चमत्कारासारखेच आहे. कारण, तेल लावताच तूम्हाला शात व गाढ झोप लागते. 

Eucalyptus Oil
Pune News : पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या रुपाली पाटील थेट CM शिंदेंच्या भेटीला

पायाच्या दुखण्यावर आता गोळी खाण्याची गरज नाही.  पाय आणि गुडघे पाठदुखीवर निलगिरी तेल फायद्याचे ठरते. डोळ्यांची नजर कमजोर झाली असेल तर त्यावरही हे तेल कमालीचे गुणकारी ठरत आहे.

जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी देखील मदत करते.

डोकेदुखी, थकवा किंवा तणाव झाल्यास त्या तेलाचे दोन थेंब कपाळावर लावा आणि हलक्या हातांनी पसरवा. यानंतर, काही काळ झोपा. भरपूर विश्रांती घ्या. अरोमा थेरपीमध्ये देखील हे तेल वापरले जाते.

Eucalyptus Oil
Solapur : नवीन वर्षाचा प्रारंभामुळे होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे महत्वाची बैठक

(ही बातमी वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मताशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com