Face Care Routine : फेशिअल का आणि कधी करावे? पहा काय सांगतात एक्सपर्ट्स!

महिन्यातून दोनदा फेशियल केल्याने त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होईल
face care
face care esakal

आपल्या चेहऱ्याला मऊ मुलायम फ्रेश दिसण्यासाठी सतत काहीतरी ट्रिटमेंट करण्याची गरज आहे का?. काही महिला तर सतत पार्लरमध्ये जाऊन तासंतास तिथे घालवतात. हे असे करणे काहीजणींना पटत नाही. पण, खरंच आपल्या चेहऱ्याला पंधरा दिवसातून एकदा फेशिअल करण्याची गरज आहे का? यावर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे पाहुयात.

आपला चेहऱ्याला डिप क्लीन करण्यासाठी मसाजची गरज असते. त्यामूळेच तुम्ही कोणत्याही स्किन एक्सपर्टकडे गेलात तरी तो तुम्हाला फेशियल करायला नक्कीच सांगतो. साधारणपणे महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा ते करून घेतात. मात्र, महिन्यातून दोनदा म्हणजे १५ दिवसांतून एकदा फेशियल केले, तर त्वचेला अधिक फायदे होतील, असे मत ब्युटी एक्सपर्टचे आहे.

face care
Face Wash : चेहरा धुताना चुकूनही या गोष्टी करू नका

फेशिअलची गरज का आहे

ब्युटी एक्सपर्ट रश्मी शेट्टी यांच्या मते, १५ दिवसांतून एकदा फेशियल केल्याने त्वचा क्लीन राहण्यास मदत होते. हे छिद्र स्वच्छ करण्यासोबतच डेड स्कीन काढून टाकते. तसेच ब्लॅकहेड्स ते व्हाईटहेड्स दूर करते. त्यामूळे महिन्यातून दोनदा अशी ट्रिटमेंट केल्यास त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार बनते.

face care
Face Recognition: फक्त चेहरा दाखवा आणि बँकेतून पैसे काढा, खातेधारकांसाठी येणार खास टेक्नोलॉजी

त्वचारोगतज्ञ रश्मी शेट्टी यांनी याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी एखाद्या व्यक्तीने किती वेळा फेशियल करावे याबद्दल कोणताही निश्चित नियम नाही. पण, जर तूमची त्वचा कोरडी असेल तर महिन्यातून दोनदा फेशियल केल्याने त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होईल. त्याचा चेहऱ्याला फायदा होईल, असे सांगितले.

face care
Face Care Tips: आलियासारखा चमकदार अन् टवटवीत चेहरा हवा असेल तर करा हा एक उपाय

फेशिअल आवडत नसेल तर चेहऱ्याला क्लिनअप केले तरीही चांगला फरक पडतो. ज्यांच्या चेहऱ्यावर सतत ब्लॅकहेड्स येतात त्यांनी 15 दिवसांतून एकदा क्लीनअप करावे, असेही रश्मी यांनी सांगितले.

face care
Face Bleach : चेहरा काळवंडलाय? घरीच करा १० रुपयांत नॅचरल ब्लीच

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com