Face Cleanser At Home : त्वचा उजळण्यासाठी असा तयार करा बेकिंग पावडरपासून Face Cleanser

क्लींझर चेहऱ्यावरील दुर्गंध आणि धूळ- मातीचे कण काढण्याचे कार्य करते
Face Cleanser At Home : त्वचा उजळण्यासाठी असा तयार करा बेकिंग पावडरपासून Face Cleanser

Face Cleanser At Home : त्वचा निरोगी राहण्यासाठी नियमित योग्य प्रकार देखभाल करणं आवश्यक आहे. त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण क्लींझर आणि फेसवॉशचा वापर करतो. ही सौंदर्य उत्पादने त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करतात आणि आपली त्वचा निरोगी ठेवण्याचे कार्य करतात.

तसे जास्त वापरले जाणारे फेसवॉश आणि क्लींझर हे त्वचा स्वच्छ करण्याचे कार्य करतात. पण फेसवॉश एक फोमिंग क्लींझर आहे तर क्लिनिंग लोशन किंवा क्लींझिंग मिल्क नॉन-फोमिंग ब्युटी प्रोडक्ट आहे. क्लींझर चेहऱ्यावर लावल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ केली जात नाही तर कापसाच्या मदतीने केवळ चेहरा स्वच्छ केला जातो.

क्लींझर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, मेकअप, दुर्गंध आणि धूळ- मातीचे कण काढण्याचे कार्य करते. क्लींझरचे फायदे पाहून सगळेच त्याचा वापर करत आहेत.पण, ते रेडीमेड वापरण्यापेक्षा होम मेड असलेले क्लींझर वापरले तर तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो. त्यामुळे घरच्या घरी क्लींझर कसे बनवायचे ते पाहुयात.

Face Cleanser At Home : त्वचा उजळण्यासाठी असा तयार करा बेकिंग पावडरपासून Face Cleanser
Home Remedies : रात्री चेहऱ्यावर हळद लावण्याचे फायदे

बेकिंग सोड्यापासून बनवता येतो क्लींझर

घरच्या घरी बेकिंग सोडा फेस क्लींझर बनवण्याची पद्धत आज आपण जाणून घेऊयात. बेकिंग सोडा तुमच्या चेहऱ्यावरील सर्व घाण पूर्णपणे स्वच्छ करतो. बेकिंग सोडा तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकून रंगही सुधारतो.

बेकिंग सोडा फेस क्लींझर कसा बनवायचा

बेकिंग सोडामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरील सर्व घाण पूर्णपणे स्वच्छ करतात. याशिवाय बेकिंग सोडा क्लींझर छिद्रे बंद करण्यासाठी फायदेशीर आहे. एवढेच नाही तर बेकिंग सोडा तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून रंगही सुधारतो, चला तर मग जाणून घेऊया बेकिंग सोडा फेस क्लींझर कसा बनवायचा.

Face Cleanser At Home : त्वचा उजळण्यासाठी असा तयार करा बेकिंग पावडरपासून Face Cleanser
Home Loan : गृहकर्जाचे हप्ते आणि व्याज कमी कसे कराल ?

Cleanser साठी आवश्यक गोष्टी

  • बेकिंग सोडा 1 टीस्पून

  • नारळ तेल 2 टेस्पून

  • लिंबू 1 टीस्पून

क्लींझर कसा बनवाल

  • बेकिंग सोडा फेस क्लिन्जर बनवण्यासाठी सर्वप्रथम एक छोट्या आकाराचे भांडे घ्या.

  • मग त्यात २ चमचे खोबरेल तेल आणि एक चमचा बेकिंग सोडा घाला.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात १ चमचा लिंबाचा रस देखील घालू शकता.

  • नंतर या सर्व गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट बनवा.

  • आता तुमचा बेकिंग सोडा फेस क्लींझर तयार आहे.

Face Cleanser At Home : त्वचा उजळण्यासाठी असा तयार करा बेकिंग पावडरपासून Face Cleanser
Piles Home Remedies : मुळव्याधीवर औषधांचा होत नाही काहीच असर; ही घरातली वस्तू करेल रामबाण इलाज!

कसे वापरायचे हे Cleanser

बेकिंग सोडा फेस क्लिन्जर चेहऱ्यावर पूर्णपणे लावा.

त्यानंतर 1-2 मिनिटे गोलाकार हालचालीत आपल्या चेहऱ्याची मालिश करा.

यानंतर, आपला चेहरा सामान्य पाण्याने धुवा आणि स्वच्छ करा.

तुम्ही चेहरा नैसर्गिकरित्या कोरडा करा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे. यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com