esakal | ३० एप्रिलपर्यंत देशात कडक लॉकडाउन?
sakal

बोलून बातमी शोधा

break the chain

३० एप्रिलपर्यंत देशात कडक लॉकडाउन?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

Fact check : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्येच देशातील एकंदरीत रुग्णसंख्येचा आकडाही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत देशात कडक लॉकडाउन घोषित करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या देशातील लॉकडाउनविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील जनता चिंतेत पडली आहे. मात्र, केंद्र सरकारने याविषयी कोणताही ठोस निर्णय घेतला नसून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती खोटी असल्याचं PIB ने स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर देशात लॉकडाउन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत देशात पुन्हा लॉकडाउन होणार असून या काळात सारे व्यवहार सक्तीने बंद करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. याविषयी एक पोस्टदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. परंतु, ही अफवा असून यात काहीही सत्यता नसल्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ( PIB) या संस्थेने स्पष्ट केलं आहे. पीआयबीने फॅक्ट चेक करत याविषयीची सत्य माहिती जनतेसमोर आणली आहे.

हेही वाचा : सावधान! आठ पदार्थांमुळे कोरोनाचा धोका; इम्युनिटीवर करतात परिणाम

Fact Check :

पीआयबीने ट्विटवर एक पोस्ट शेअर करत देशातील लॉकडाउनची माहिती खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच खोटी माहिती देणारा व्हायरल होत असलेला फोटो मॉर्फेड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"भारत सरकारने १५ ते ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करणारा एक मॉर्फेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, ही माहिती चुकीची व खोटी आहे. भारत सरकाराने देशात लॉकडाउन करण्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कृपया अशा कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या पोस्ट किंवा फोटोवर विश्वास ठेऊ नका व ते व्हायरलही करु नका", असं ट्विट पीआयबीने शेअर केलं आहे.

हेही वाचा : वाईन शॉपपासून प्रवासापर्यंत; निर्बंधांबाबत तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं

दरम्यान, यापूर्वी लॉकडाउनसंदर्भात बऱ्याच चुकीच्या व खोट्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, त्यावर पीआयबीने सत्यपरिस्थिती जनतेसमोर सांगितली आहे.