Fashion Tips : गौहर खानचा ग्रीन एथनिक को-ऑर्ड सेटमधील क्लासी लुक पाहिला का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gauahar khan

Fashion Tips : गौहर खानचा ग्रीन एथनिक को-ऑर्ड सेटमधील क्लासी लुक पाहिला का?

काही वर्षांपुर्वी बांधणी डिझाईनच्या साड्यांचा ट्रेंड होता. त्याच डिझाईन्स आता ड्रेसमध्येही आल्या आहेत. अलिकडेच अभिनेत्री गौहर खान 'बारिश में तुम' गाण्याच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये गौहरने हिरव्या रंगाचा सुंदर बांधणी वर्क असलेला को-ऑर्डर सेट घातला होता. तिची ही स्टाइल अनेकांनी कॉपी केली आहे. 

हेही वाचा: Navratri 2022: जोगवा का मागितला जातो ?

गौहर तिच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. रेड कार्पेट असो वा अवॉर्ड शो ती नेहमीच स्टनिंग लुकमध्ये दिसते. बांधणी को-ऑर्डर सेट डिझायनर लेबल सोनम लुथरिया यांनी डिझाइन केला होता. तिच्या या नविन बांधणी स्टाईलवर चाहते फिदा झाले आहेत. या टॉपवर टाइट फिटींग पॅंटसह प्लेन ऑलिव्ह ग्रीन क्रॉप टॉप घातला होता. हा ड्रेस स्टायलिश बनवण्यासाठी गौहरने या आउटफिटवर कोणतीही अॅक्सेसरीज घातली नाही.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : यंदा घटस्थापनेला विशेष योग, जाणून घ्या मुहूर्त

'बारिश में तुम'च्या प्रमोशनच्या पहिल्या दिवशी गौहर खानने प्रिंटेड कफ्तान वनपिस घातला होता. छवी अग्रवालने हा ड्रेस डिझाईन केला होता. त्यात गौहर अधिकच सुंदर दिसत होती. या ड्रेसवर गौहरने स्टड इअरिंग्ज घातले होते.