Shardiya Navratri 2022 : यंदा घटस्थापनेला विशेष योग, जाणून घ्या मुहूर्त

navratri festival news
navratri festival news esakal

अश्विन शुध्द प्रतिपदेपासुन शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. यंदा 26 सप्टेंबरला नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. याकाळात सार्वजनिक तथा घरोघरी घटस्थापना आपल्या कुटुंबातील कुळाचारानुसार केली जाते. घरातली घटस्थापना ही मुहूर्तावर व्हायला हवी असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी आपण घटस्थापनेचे शुभ मुहूर्त जाणून घेवूया. (Navratri 2022 Special yoga for Ghatasthapana this year Muhurta spiritual significance)

navratri festival news
Navratri 2022: जोगवा का मागितला जातो ?

असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

शारदीय नवरात्रोत्सावाला अश्विन शुध्द प्रतिपद 26 सप्टेंबर सोमवारपासुन प्रारंभ होत असून. कोरोनाच्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा केला जात असल्याने सर्वत्र उत्साह अन् चैतन्याच वातवरण आहे. देवीच्या आगमानाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु असून घटस्थापनेसाठी मुहूर्त आपण जाणून घेवू

यंदा प्रतिपदा तिथी सूर्योदयापासून ते पहाटे 03:09 मिनीटांपर्यंत आहे. त्यानंतर द्वितिया तिथी सुरू होत आहे. तसेच सूर्योदयापासून हस्त नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर चित्रा नक्षत्र आहे. शुक्ल योग सकाळी 8 वाजून 4 मिनिटांपर्यंत असून त्यानंतर पहाटे 3 वाजेपर्यंत ब्रह्म योग आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत किंस्तूघ्ण करण असून त्यानंतर बव करण आहे.

navratri festival news
Sharadiya Navratri 2022: नवरात्रीचे नऊ दिवस वास्तुशास्त्रातल्या या गोष्टींचे पालन केल्याने देवीचा आशीर्वाद मिळू शकतो

अमृत मुहूर्त - सकाळी 5 वाजेपासून 7:41 वाजेपर्यंत

लाभ मुहूर्त - सकाळी 11:44 वाजेपासून ते दुपारी 12:42 पर्यंत

राहू काळ - सकाळी 7:42 ते 9:18

आपल्या कुटुंबातील कुळाचाराप्रमाणे घटस्थापना ही सुर्योदयापासून ते सुर्यास्त किंवा कुळातील प्रथेप्रमाणे करता येते/करावे.

मुहूर्त विवेचन - पं. नरेंद्र धारणे, नाशिक (धर्म अभ्यासक)

navratri festival news
Navratri 2022: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? कारण राक्षसांशी संबंधित आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com