ट्रेंडी नऊवारी

फॅशन ट्रेंडमध्ये पारंपरिक वेशभूषा आणि तिला साजेसा श्रृंगार याची बातच और. आता नऊवार साडी नेसण्याची पद्धत ट्रेंडी आहे.
trend nauvari saree
trend nauvari sareesakal

- पृथा वीर

फॅशन ट्रेंडमध्ये पारंपरिक वेशभूषा आणि तिला साजेसा श्रृंगार याची बातच और. आता नऊवार साडी नेसण्याची पद्धत ट्रेंडी आहे. या देखण्या साडीला तितक्याच सुंदर ब्लाउजची जोड मिळाली, तर नजर हटत नाही. बीड स्टिच, नॉटस फ्रिल्स, बोटनेक, कटवर्क, महाराणी स्टाइल, पफ स्लीव्हज आदी ब्लाउजचे डिझाइन एकदा नक्की ट्राय करून बघा.

नऊवार नेसलेल्या सेलिब्रिटींचा फोटोशूट चांगलाच गाजतो आहे. सिरीअलमध्येही नऊवार साड्या दिसतात. सिल्क, कॉटन, महाराणी पैठणी, फ्लोरल पैठणी, काठपदराच्या मोठ्या बॉर्डरच्या, डिझायनर साड्या अशा कोणत्याही प्रकारात नऊवार नेसताही येते आणि रेडिमेडही मिळते. त्यामुळे ऐनवेळी मदतीला कुणी नसले, तरीही नऊवार नेसून तयार होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

केवळ मराठी भाषक नव्हे, तर नऊवार साडीचे आकर्षण सर्वांनाच आहे. अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री या साडीवर फोटोशूट करतात. महिला मंडळ नऊवारीची थीम घेऊन वर्षांतून एक कार्यक्रम तरी आवर्जून घेतात.

या प्रकारच्या नऊवारीमध्ये सिल्क साड्यांना खास मागणी असते. यामध्ये पैठणी सिल्क जास्त प्रमाणात वापरली जाते. अतिशय चापून चोपून घट्ट बसेल अशा तऱ्हेने ही साडी नेसण्यात येते. साडीचा पदर हा एका सरळ रेषेमध्ये काढलेला नसतो आणि खांद्यावरून वरखाली अशा प्रकारे काढला जातो. मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावेत अशा तऱ्हेने काढला जातो. ‘कॉटन ब्लेंड’ नऊवारी साडी नेसायलाही सोपी असते आणि अंगाला व्यवस्थित बसते.

पैठणी साड्यांमध्ये बिग बॉर्डर नऊवारी अधिक चांगल्या दिसतात. सिरीयलमध्ये अशा नऊवारी बघायला मिळतात. पैठणी साडी ही ‘पेशवाई’ अथवा 'ब्राह्मणी' कोणत्याही पद्धतीने नेसता येते. ‘कोल्हापुरी नऊवारी’मध्ये साधारणतः दोन काष्टा असलेल्या नऊवारी साड्या असतात. ज्याला डबल काष्टा असेही म्हणतात. म्हणजे डबल काष्टामध्ये दुभागलेल्या भागामध्ये दोन काष्टे दिसतात. ज्याला काठही असतात.

विविध प्रकार

नऊवारीमध्ये जास्त आर्कषण आहे ते ‘पेशवाई नऊवारीचे. इतर नऊवारी व पेशवाई नऊवारीतला मूलभूत फरक म्हणजे ओचा. या नऊवारीमध्ये ओचा असतोच. काष्टा व ओचा असलेल्या नऊवारीचा डाव्या पायाच्या ‌निऱ्या जास्त ठेवाव्या लागतात, तर उजव्या पायाच्या निऱ्या कमी उंचीच्या असतात.

गडद रंगाची, काठापदराची साडी असेल तर आर्वजून पेशवाई नऊवारीच नेसल्या जाते. बेळगावी सिल्क, बॅँगलोरचे सिल्क, येवला प्युअर सिल्क, येवला पैठणी, आर्टिफिशिअल सिल्क, पॉलिस्टर, बेळगाव मिक्स, मदुराई पॅटर्न, कोल्हापुरी इरकल, सेमी पैठणी अशा वेगवेगळ्या प्रकारातल्या नऊवारी साड्या निवडून ‘रेडी टू वेअर’ नऊवारी शिवता येते.

साजेसा श्रृंगार

नऊवारीवर वेगवेगळे दागिने खूप शोभून दिसतात. नऊवारी साडीवर सर्वांत महत्त्वाचा दागिना म्हणजे नथ. मोत्याची, ऑक्सिडाइज्ड नथ चेहऱ्याला शोभा आणते. सोन्याचे, मोत्याचे दागिने नऊवारी साडीवर छान दिसतात. सहसा नऊवारीवर केसांचा अंबाडा अथवा खोपा पाडला जातो.

या हेअरस्टाईलवर माळलेला गजरा, त्यानंतर मोत्याचे वेल आणि कुडी, झुमके चांगले दिसतात. गळ्याला घट्ट बसणारी अशी चिंचपेटी, ठुशी, काळ्या मण्याचे मंगळसूत्र,काहीसा लांब असा मोत्याचा लफ्फा अथवा तीन पदरी मोत्यांचा हार, हातात पाटल्या अथवा बिल्वरचा एखादा प्रकार, मोत्याचा बाजूबंद, कमरपट्टा, मेखला (कंबरपट्याचाच प्रकार), पैंजण या दागिन्यांना पसंती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com