Father’s Day 2022 : वडिलांना काही खास गिफ्ट द्यायचंय? हे गॅजेट्स ठरतील परफेक्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fathers day 2022 best gadgets and fathers day gifts for dad to make him happy

Father’s Day 2022 : वडिलांना काही खास गिफ्ट द्यायचंय? हे गॅजेट्स ठरतील परफेक्ट

Father's Day 2022 : फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडीलांना काहीतरी हटके गीफ्ट देण्याचा विचार करत असाल तर, आज आपण असे काही गॅजेट पाहाणार आहोत जे तुमच्या वडिलांसाठी बेस्ट गिफ्ट ऑप्शन ठरू शकतात. दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 जून रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस वडिलांना आपल्या जीवनातील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. (fathers day 2022 best gadgets and fathers day gifts for dad to make him happy)

दरम्यान, फादर्स डे च्या विशेष प्रसंगी, जर तुम्हालाही तुमच्या वडिलांना स्पेशल फिलींग देण्याचा विचार करत असाल असेल तर तुम्ही त्यांना एक छान छोटे गॅजेट गिफ्ट देऊ शकता, अशा गॅजेट्सचा त्यांच्या दैनंदीन जीवनात वापराता येतील. चला जाणून घेऊया काही छान गॅजेट्सबद्दल जे तुम्ही तुमच्या वडिलांसाठी बेस्ट गिफ्ट ठरू शकतात.

स्मार्ट वॉच

बाप मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. स्मार्ट गॅजेट्सपासून ते महागड्या कपड्यांपर्यंत सर्व काही बाबांनी मुलांसाठी दिलेल्या असतात. आता बाबांना काही परत देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या फादर्स डे ला तुम्ही, तुमच्या वडिलांच्या फिटनेसची काळजी घेत, त्यांना एक चांगली स्मार्ट वॉच भेट द्या.

ट्रिमर

वडीलांना रोजच्या दाढी करण्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यांना एक मस्त दाढी ट्रिमर भेट देऊ शकता. हे स्मार्ट लूक ट्रिमर त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. चांगली गोष्ट म्हणजे असे ट्रिमर चार्ज केल्यानंतर 60 मिनिटे आरामात चालतात.

हेही वाचा: वडिलांना पाठवा Father's Day च्या हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक भारी Quotes

होम स्मार्ट स्पीकर

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंटला कोणताही प्रश्न विचारू शकता, त्यानंतर तुम्हाला गुगल असिस्टंटकडून आवाजात उत्तर मिळेल. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या वडिलांना Google Home स्मार्ट स्पीकर भेट देऊ शकता. हे तुमच्या वडिलांसाठी बातम्या देखील वाचू शकते आणि त्यांच्यासाठी आवडते संगीत प्ले करू शकते. एवढेच नाही तर तुम्ही हवामानाची माहिती देखील घेऊ शकता तसेच आवाजाने मित्रांना कॉल देखील करू शकता.

इअरबड्स

वडीलांना कूल आणि ट्रेंडी फील देण्यासाठी या फादर्स डेला त्यांचे जुने इअरफोन बदलून त्यांना नवीन इयरबड्स भेट द्या. याद्वारे, तुमचे वडील ब्लूटूथद्वारे त्यांच्या मोबाइलवरून इअरबडशी कनेक्ट करून गाणी ऐकू शकतील.

हेही वाचा: Fathers Day: आपल्या आईवडिलांना द्या असंही अनोखं 'गिफ्ट'

पावरबँक

ऑफिसचे काम असो किंवा कुठेतरी प्रवास असो, फोनची बॅटरी लवकर संपते. अशा स्थितीत वडीलांच्या फोनची बॅटरी संपू शकते, त्यामुळे तुम्ही त्यांना पॉवर बँक गिफ्ट देऊ शकता, ती नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि पॉवर बँक वडिलांना नक्की आवडेल.

Web Title: Fathers Day 2022 Best Gadgets And Fathers Day Gifts For Dad To Make Him Happy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :fathers day
go to top