Fitness Tips: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

Fitness Tips: तुम्हाला पोटावरची चरबी किंवा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर पुढील व्यायाम करू शकता.
Weightlos|Yogatips
Weightlos|YogatipsSakal

शरीरातील अतिरिक्त चरबी वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाची कारणे म्हणजे अनियमित आहार, योगाचा अभाव आणि जास्त जंक फूड किंवा पोषण नसलेले पदार्थ खाणे. जेव्हा तुमच्या शरीराला अतिरिक्त कॅलरीज येतात आणि ते वापरत नाहीत, तेव्हा ते अतिरिक्त कॅलरीज चरबी म्हणून साठवतात. शरीरातील चरबी वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. वजन कमी करण्यासाठी पौष्टिक आहारासोबतच शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. याशिवाय व्यायाम आणि योगासने करणे गरजेचे असते.

भुजंगासन

पाठीची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन करू शकता. या आसनामुळे रक्ताभिसरण सुधारते. जर कंबर जाड असेल आणि बाकीचे शरीर पातळ असेल तर भुजंगासन नियमित करावे. भुजंगासन करण्यासाठी सर्वात आधी पोटावर झोपा, तुमचे तळवे खांद्याच्या खाली ठेवा, श्वास घ्या आणि शरीराचा पुढचा भाग वर घ्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत परत या.

धनुरासन

वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही धनुरासन करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी मानले जाते. याशिवाय हात आणि पायांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही हा योग देखील करू शकता. हा योग करताना पोटावर झोपा झोपून, गुडघे वाकवा आणि हातांनी पाय धरा. आता श्वास घेताना छाती वर उचला आणि हाताने पाय ओढा. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करताना 15-20 सेकंद या स्थितीत रहा.

Weightlos|Yogatips
Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

त्रिकोनासन

त्रिकोनासन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि चेहऱ्यावर चमक येते. तसेच शरीर लवचिक होते आणि स्नायूंची ताकद वाढते आणि कंबरेची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. हा योग करण्यासाठी सर्वात आधी सरळ उभे राहून पायांमध्ये थोडे अंतर ठेवावे. आता कंबर डावीकडे वाकवा आणि डाव्या हाताने डाव्या पायाच्या बोटांना स्पर्श करा. नंतर उजवा हात डोक्याच्या वर सरळ ठेवा. कंबर उजवीकडे वाकवून उजव्या हाताने पायाच्या बोटांना स्पर्श करून दोन्ही बाजूंनी ही क्रिया पुन्हा करा.

टिप: वरील योग करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com