esakal | लग्न असो वा पार्टी, काही मिनिटांत सुंदर दिसण्यासाठी स्किन केयर टिप्स फॉलो करा

बोलून बातमी शोधा

Follow some skin care steps to look beautiful}

घरीच स्किन केयर टिप्स फॉलो केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो मस्त दिसेल. 

lifestyle
लग्न असो वा पार्टी, काही मिनिटांत सुंदर दिसण्यासाठी स्किन केयर टिप्स फॉलो करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जर एखाद्या फंक्शनमध्ये आपल्याला इंस्टेंट ग्लो हवा असेल तर, त्यासाठी पोर्लरमध्ये जाऊन ब्लीच फेशियल करण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही घरीच स्किन केयर टिप्स फॉलो केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो मस्त दिसेल. 

दररोज एक टोमॅटो खाल्यास आरोग्य आणि चेहऱ्यासाठी होतील हे फायदे 

आजच्या स्त्रियांसाठी आधुनिक जीवनशैली, घरातील आणि बाहेरच्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडून स्वत: साठी वेळ काढणे अवघड बनले आहे. बर्‍याच वेळा त्यांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसते. परंतु प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि ग्लैमरस दिसण्याची इच्छा असते, मग आपण स्वतःसाठी थोडा वेळ का देऊ नये? बरोबर ना. येथे दिलेल्या स्किन केयर रूटीनची काळजी घेतल्यास तुम्ही खूप सुंदर दिसू शकता.

लोण्यासारखी त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा मलाई

क्लिंजिंग
  
त्वचा साफ करण्यासाठी सुरवातीला डबल अ‍ॅक्शन क्लिंन्जर मिल्कचा वापर करा. यामुळे डीप क्लिंजिंग आणि एक्सफोलिएशन देखील होईल. आपल्या हातात क्लिंजिंग घ्या आणि गोलाकार हात फिरवत ते चेहऱ्यावर लावा. ओल्या कापसाने वरपासून खालीपर्यंत पुसून टाका. असे केल्याने केवळ चेहऱ्यावरील घाण आणि धूळच नाही तर डेड स्किनदेखील दूर होईल. क्लिंजिंग  करण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधात मिसळलेली हळद देखील वापरू शकता.

एक्सफोलिएट

तुमच्या त्वचेनुसार मऊ एक्सफोलिएट पावडर वापरा. जेणेकरून क्लिंजिंगनंतर डेड स्किनदेखील सहज काढता येईल. तसेच नैसर्गिक आणि ऑर्गेनिक एक्सफोलीएटर पावडरचा वापर अधिक चांगला होईल.

फेस मास्क

अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन असलेले मास्क लावा. दोन चमचे मधात अर्धा चमचा पपईचा तुकडा मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. मग मॉइश्चरायझर लावा. हा मास्क सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. मास्क काढून टाकल्यानंतर, चेहऱ्यावर बोटांनी स्ट्रोक देताना हॅड्रा ब्युटी सीरमचे चार ते सहा थेंब तळहातावर लावा.

सनस्क्रीन क्रीम

तुम्ही घराबाहेर जा किंवा नाही त्यावेळी शेवटी सनस्क्रीन क्रीम लावा. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचा सुरक्षित राहील आणि त्वचा पूर्णपणे फ्रेश दिसेल.