High Heels आवडतात? मग ट्राय करा या टिप्स |Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

high heels

High Heels आवडतात? मग ट्राय करा या टिप्स

हिल्स फुटवियर घालणे हे अनेक मुलींसाठी खुप मोठं टास्क असतं. अनेकदा हिल्स फुटवियर आवडत असतानाही अनेक मुली याच कारणाने हील्स घालणे,टाळतात पण जर तुम्हाला हाय हिल्स घालायच्या असतील तर काही टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात ज्याच्या मदतीने तुम्ही हाय हिल्सवर परफेक्ट लुक मिळवू शकता.

हिल्स घालून चालणे ही सुद्धा एक कला आहे. ज्यात तुमची चालही सुंदर दिसायला पाहीजे. अनेक वेळा हिल्स घालून नीट चालत नसल्यामुळे पाय दुखण्याची समस्यासुद्धा निर्माण होते. त्यामुळे हिल्स घालताना नेहमी काही टिप्स लक्षात ठेवाव्यात.

योग्य साइज

आपल्या हिल्स फुटविअरचा साइज योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच आपले हिल्स फुटविअर विश्वासार्ह ब्रँडचे असावे जे घालताना सोयीस्करच नाही तर चालताना देखील आरामदायक वाटेल.

सराव

तुमच्या साइजच्या हिल्स फुटविअरची योग्य जोडी खरेदी केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती घालण्याचा सराव करणे. जेव्हा तुम्ही हिल्स फुटविअर खरेदी करता तेव्हा ते घालून घरात फिरण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास वाढवत नाही तोपर्यंत सराव करा. हिल्स घातल्यानंतर पायात दुखत असेल तर पाय दाबून किंवा मसाज करून तुम्हाला आराम मिळेल.

जर तुम्ही पहिल्यांदा हिल्स घालून चालण्याचा प्रयत्न करत असाल, तर पायापेक्षा आधी टाचांवर जोर देऊन चालण्याचा प्रयत्न करा. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी पेन्सिल हिल्स घालून चालण्यापूर्वी ब्लॉक हील्स घालून चालण्याचा प्रयत्न करा. ब्लॉक हिल्स सँडलही अनेक ड्रेसेसशी मॅच होतात आणि स्टायलिश लुक देतात.

योग्य डिझाइन आणि उंची

जर तुम्हाला पहिल्यांदा हिल्स घालायची असतील तर पम्प्स घालणे सुरक्षित असेल. पम्प्स बऱ्याच कपड्यांशी मॅच होतील आणि स्टाइलिश दिसतील. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी आधी फक्त दोन ते तीन इंच हिल्स घालून जा. जेव्हा तुम्हाला या हिल्स घालायची सवय होणार तेव्हा चार ते पाच इंचाची टाच घाला.