Health Care : हिवाळ्यात स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

हिवाळ्यात आपल्यातील अनेक जण खूप कमी प्रमाणात पाणी पितात. थोडक्यात पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. कारण, हिवाळ्यात आपल्याला जास्त तहान लागत नाही आणि आपण खूप कमी प्रमाणात पाणी पितो.
Health Care
Health Careesakal

Health Care : हिवाळ्यात आपल्यातील अनेक जण खूप कमी प्रमाणात पाणी पितात. थोडक्यात पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. कारण, हिवाळ्यात आपल्याला जास्त तहान लागत नाही आणि आपण खूप कमी प्रमाणात पाणी पितो. ज्यामुळे, आपले शरीर डिहायड्रेटेड होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, उन्हाळा असुदे किंवा हिवाळा आपण सर्वांनी या थंडीच्या दिवसांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. जर कमी प्रमाणात पाणी प्यायले गेले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये शरीर हायड्रेटेड ठेवणे हे फार महत्वाचे आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Health Care
Health Care : हिवाळ्यातील सुपरफूड आहे बाजरी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

गरम पाणी प्या

हिवाळ्यात वातावरणातील थंडाव्यामुळे पाणी देखील थंड होते. त्यामुळे, हे थंड पाणी प्यावेसे वाटत नाही. हिवाळ्यात कमी प्रमाणात पाणी पिण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. अनेक जण या दिवसांमध्ये आळशी होतात. परंतु, या दिवसांमध्ये आळस सोडून सक्रिय होणे, हे फार महत्वाचे आहे. (Drink hot water)

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. विशेष म्हणजे हिवाळ्यात कोमट पाणी पिणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

पाणी पिण्याचा एक गोल सेट करा

हिवाळ्यात वातावरणातील थंडाव्यामुळे पाणी देखील थंड होते. त्यामुळे, हे थंड पाणी प्यावेसे वाटत नाही. मग, अनेक जण हिवाळ्यात कमी प्रमाणात पाणी पितात. परंतु, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. (Set a drinking goal)

त्यासाठी, एक गोल सेट करणे आवश्यक आहे. तुम्ही दिवसभरात २-३ बाटल्या पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी, तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाणी पिण्याचे रिमांइडर सेट करून ठेवू शकता.

हर्बल टी

थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासोबतच तुमची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे महत्वाचे आहे. जर रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असेल तर तुम्ही संसर्गजन्य रोगांना रोखू शकाल. त्यासाठी हर्बल टी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हर्बल टी जरूर प्या. (Herbal tea)

Health Care
Health Care : हिवाळ्यात अशा प्रकारे करा खडीसाखरेचा वापर, मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com