जुना स्मार्टफोन विकून मिळवा चांगली किंमत, फॉलो करा या सोप्या ट्रिक्स |Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना स्मार्टफोन विकून मिळवा चांगली किंमत, फॉलो करा या सोप्या ट्रिक्स

जुना स्मार्टफोन विकून मिळवा चांगली किंमत, फॉलो करा या सोप्या ट्रिक्स

जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल आणि तुम्हाला तो स्मार्टफोन विकायचा असेल आणि तुम्ही दुसरा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली कल्पना आहे मात्र अनेकदा असे घडते जेव्हा तुम्ही जुना स्मार्टफोन विकायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी किंमत मिळते आणि मग नवीन स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला तुमच्या खिशातून जास्त पैसे द्यावे लागतात.

हेही वाचा: Reels बनवायला आवडतं? कमवा महिन्याचे तीन लाख, Facebook ची मोठी घोषणा

जर तुम्हाला एखादा महागडा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर साहजिकच जुना स्मार्टफोन विकून चांगली रक्कम मिळवण्याचा तुमचा प्रयत्न असतो आणि यातून तुम्ही तुमचा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुम्हालाही तुमच्या जुन्या स्मार्टफोनची चांगली किंमत मिळवायची असेल, तर खालील अगदी सोप्या टिप्स फॉलो करा

1.तुमच्या जुन्या स्मार्टफोनचे बिल सांभाळून ठेवा

जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन विकणार असाल आणि तुमचे बिल अजूनही सुरक्षित असेल तर तुम्हाला स्मार्ट फोनची चांगली किंमत मिळू शकते कारण यामुळे खरेदीदाराला कळू शकते की तुम्ही स्मार्टफोन विकत घेतला असून कोणाकडून सेकंड हँड घेतलेला नाही.

2. दुरुस्तीची पावती ठेवा

जर तुमचा स्मार्टफोन कधीही खराब झाला असेल आणि तुम्ही तो कधीही दुरुस्त केला असेल, तर तुमच्याकडे त्याची पावती देखील असणे आवश्यक आहे जेणेकरुन तो खरेदी करणाऱ्या व्यक्तीला कळू शकेल की तुम्ही या स्मार्टफोनवर किती पैसे खर्च करेल.

हेही वाचा: टॉमेटोचे तिखट-गोड लोणचे वाढवेल जेवणाचा स्वाद

3. टेम्पर्ड ग्लास डिस्प्लेवर लावा

जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये टेम्पर्ड काच बसवली नसेल, तर ती नक्कीच लावा कारण त्यामुळे स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर सहजपणे स्क्रॅच दिसणार नाही आणि तुमच्या जुन्या स्मार्टफोनला चांगली किंमत मिळणार.

4. अॅक्सेसरीज सुलभ असावेत

स्मार्टफोन सोबत तुम्हाला मिळणाऱ्या अॅक्सेसरीजमध्ये चार्जर, डेटा केबल आणि इअरफोन्स सुलभ असावेत. त्यामुळे तुमचा

Web Title: Follow Tips While Selling Old Mobile Phone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top