
टॉमेटोचे तिखट-गोड लोणचे वाढवेल जेवणाचा स्वाद
मुंबई : लोणच्याला भारतीय जेवणात छोटेसेच पण मानाचे स्थान आहे. देशाच्या विविध भागांत घराघरांत वेगवेगळ्या प्रकारची लोणची तयार केली जातात. अशीच एक पाककृती आपण आज पाहाणार आहोत. ही आहे टॉमेटोच्या लोणच्याची पाककृती.
हेही वाचा: उन्हाळ्याच्या दिवसांत थंडावा देणाऱ्या आइस्क्रीमचा प्रवेश भारतात कसा झाला माहितीये का ?
आवश्यक जिन्नस
२ टॉमेटो, मिरचीची भुकटी, कच्चे शेंगदाणे, जिरे, मीठ, लसूण, राईचे दाणे, मेथीचे दाणे, साखर
हेही वाचा: ONGCमध्ये काम करण्याची मोठी संधी..... असा करा अर्ज
हेही वाचा: भारतीय सैन्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवताण.... ४० जागांवर भरती सुरू
पाककृती
कढईमध्ये मेथीचे दाणे भाजून घ्या. त्यात राई घालून मिक्सरमध्ये त्याची भुकटी करून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात टॉमेटो शिजवून घ्या. त्यात थोडी साखर घाला आणि ती विरघळेपर्यंत मिश्रण शिजवा. त्यात मीठ घाला. त्यानंतर या मिश्रणात राई आणि मेथीचे मिश्रण घाला. वरून लाल मिरचीची भुकटी घाला.
हेही वाचा: राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल
हेही वाचा: असे बनवा ओल्या हळदीचे लोणचे
अशाप्रकारे टोमॅटोचे लोणचे तयार आहे. आता हे लोणचे हवाबंद डब्यात जपून ठेवा. आपल्याकडे आंबा, मिरची, आवळा, इत्यादींचे लोणचे तयार करण्याची पद्धत आहे. काही वेळा हे सर्व पदार्थ एकत्र करूनही लोणचे तयार केले जाते. टॉमेटोचे लोणचे मात्र फारसे प्रचलित नाही.
हेही वाचा: आंबट गोड चटपटीत करवंदाचे लोणचे एकदा चाखून बघाच
हेही वाचा: नारायणगाव : टॉमेटो क्रेटला उच्चांकी ८५० रुपये भाव
नेहमीची विविध प्रकारची लोणची आता नवीन राहिलेली नाहीत. भारतीय वैविध्यपूर्ण चवींचा आस्वाद घ्यायला आवडतो. त्यामुळे लोणच्यामध्येही वैविध्य असणे आवश्यक असते. आज आपण पाहिलेली टोमॅटोची पाककृती एकदा तरी करून पाहायलाच हवी. या लोणच्यामुळे दैनंदिन जेवणाला वेगळा स्वाद येईल.
हेही वाचा: घरीच तयार करा पंजाबी लोणचे; जाणून घ्या रेसिपी
Web Title: Instant Tomato Pickle Recipe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..