esakal | मायक्रोव्हेवमध्ये भात, ब्रेस्ट मिल्क गरम करताय? मग 'ही' काळजी नक्की घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

microwave

मायक्रोव्हेवमध्ये भात, ब्रेस्ट मिल्क गरम करताय?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात कोणताही पदार्थ झटपट तयार करण्यासाठी मायक्रोव्हेव microwave किंवा ओव्हनचा वापर केला जातो. त्यामुळे आज अनेक घरांमध्ये ओव्हन, मायक्रोव्हेव सहज पाहायला मिळतात. विशेष म्हणजे एकेकाळी ओव्हनचा वापर केवळ पदार्थ गरम करण्यासाठी केला जात होता. मात्र, आता ओव्हन, मायक्रोव्हेवमध्ये बेकरी प्रोडक्ट्स किंवा अन्य पदार्थ तयार केले जातात. परंतु, मायक्रोव्हेवमध्ये कोणचे पदार्थ तयार करु नयेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. (foods-you-should-never-put-in-microwave)

१. अंडी -

अनेक जण अंडी उकडण्यासाठी मायक्रोव्हेव किंवा ओव्हनचा वापर करतात. मात्र, मायक्रोव्हेवमध्ये अंडी उकडल्यामुळे ते आतमध्ये फुटू शकतात. ओव्हनचं तापमान हे जास्त असतं. त्यामुळे तापमान जास्त झाल्यामुळे अंड्यांवर दाब येऊ शकतो आणि ते फुटू शकतात.सोबतच मायक्रोव्हेव, ओव्हन खराबही होऊ शकतं.

हेही वाचा: ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या

२. ब्रेस्ट मिल्क-

स्तनपान करणाऱ्या अनेक माता ब्रेस्ट मिल्क फ्रीजमध्ये स्टोर करुन ठेवतात आणि गरज पडल्यावर ते मायक्रोव्हेवमध्ये गरम करुन बाळाला देतात. परंतु, ब्रेस्ट मिल्क मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यामुळे त्यातील पोषकद्रव्ये नष्ट होतात. तसंच दुध जास्त गरम असल्यास लहान मुलांच्या टाळूलादेखील इजा होऊ शकते.

३. पाण्याचे भांडे-

बऱ्यचा वेळा आपण ग्रीन टीसाठी पाणी मायक्रोव्हेवमध्ये गरम करतो. मात्र, मायक्रोव्हेवचं तापमान जास्त असल्यामुळे प्रथम पाण्याचा ग्लास गरम होतो आणि त्यानंतर पाणी. त्यामुळे अनेकदा पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होतं आणि ते उकळून मायक्रोव्हेवमध्येच सांडतं. यामुळे मायक्रोव्हेव लवकर खराब होऊ शकतो.

४. ब्रोकोली -

ब्रोकोली मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यास किंवा वाफवल्यास त्यातील पोषकघटक नष्ट होतात.

५. भात -

भात कधीही मायक्रोव्हेवमध्ये गरम करु नये. भात गरम केल्यामुळे त्यात बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता असते. परिणामी, फूड पॉयझनदेखील होऊ शकतं असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

loading image