Health Tips : आनंदी आणि उत्साही दिवसासाठी करा फक्त हे तीन आसनं

रोजच्या धावपळीत थकणाऱ्या मनाला आणि शरीराला योगासने एनर्जी देतात. म्हणून थोडासा वेळ काढून ही आसनं केली तर मन आणि शरीराला उर्जा मिळेल.
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

हायलाईट्स

  • शवासनामध्ये पूर्ण रिलॅक्स झाल्यासारखे वाटते त्यामुळे किमान ५ ते १० मिनीटे शवासनामध्ये नक्की थांबा.

  • शरीराबरोबरच मनावरही ताण येत असतो, अशावेळी योग पूर्ण रिलॅक्सेशन देते.

Health Tips
Yogasan: थक्क करणारे ‘अंशा’सन

योगा हा ताण दूर कऱण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक तक्रारींशी लढण्यासाठी योगामुळे आपल्याला ताकद मिळते. काही योग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार योगातील विविध आसनांमुळे आपल्याला शांत तर वाटतेच पण आपला ताणही दूर व्हायला मदत होते. योगामध्ये आपण श्वासावर लक्ष केंद्रित करत असल्याने शरीरातील एनर्जी बाहेर येण्यास मदत होते. मन आणि शरीर यांचे कनेक्शन झाल्याने आपला ताण नकळत दूर होण्यास योगाचा उपयोग होतो.

Health Tips
Yoga Day : दीपिकाही करते योगा.. फिगर बघून पब्लिक पागल..

अधोमुख श्वानासन

या आसनामध्ये संपूर्ण शरीर स्ट्रेच होते. दंड आणि खांदे, मणका, पाय अशा सगळ्या अवयवांवर ताण येत असल्याने स्नायू मोकळे होण्यास मदत होते. डोके खाली केल्याने मेंदूला रक्तपुरवठा होतो आणि त्यामुळे एनर्जी येते. सुरुवातीला पोटावर झोपावे. हात खांद्यांच्या बाजूला घेऊन कंबरेतून शरीर वर उचलावे. यामध्ये पायाचे तळवे आणि हाताचे तळवे जमिनीला टेकलेले राहतात. शरीर वरच्या बाजूला खेचल्यासारखे केल्याने शरीराला चांगला ताण मिळतो. ५ ते १० श्वासांपर्यंत याच स्थितीमध्ये थांबावे. यामुळे आपल्याला एनर्जी येते.

Health Tips
Yoga Day 2022 Photo : या मराठी अभिनेत्रींनी योगा करत दिला खास लुक..

उष्ट्रासन

दिवसभराच्या सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी मणक्याचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. दिवसभरातील विविध गोष्टींचा ताण आणि रागाचा स्ट्रेस मणक्यावर येतो. मात्र उष्ट्रासनात मागे वाकल्याने छाती ओपन होण्यास मदत होते आणि नकळत आपल्याला एनर्जी येते. गुडघ्यावर बसून दोन्ही पायांमध्ये पुरेसे अंतर घ्यायचे. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडून कंबरेतून मागे वाकायचे. हे आसन किंमान ३० सेकंदांपर्यंत टिकवावे.

Health Tips
Yoga Day 2022: ह्रतिकच्या आईचं पाण्यात 'पद्मासन', नेटकरी थक्क!

शवासन

शवासन हे योगातील एक अतिशय महत्त्वाचे आसन आहे. मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. पाठीवर झोपून हात आणि पाय एकदम रिलॅक्स सोडून द्या. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि शरीर एकदम रिलॅक्स करा. शरीर आणि मनामध्ये होणारे बदल अनुभवा. किमान ५ ते १० मिनीटे या आसनामध्ये नक्की थांबा. थोडा वेळाने हळूवार एका कुशीवर वळून मग उठा. या आसनामुळे शरीराबरोबरच मनही रिलॅक्स व्हायला मदत होते.

Health Tips
Yoga Day 2022: वयाची चाळीशी ओलांडली पण याचं सौंदर्य अजुनही तेच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com