Friendship Goal : लग्नानंतर फ्रेंडस दूर जातील याची भीती वाटते? फॉलो करा 5 टिप्स

लग्नानंतर मुलीला तिचं माहेरचं घर सोडून सासरच्या घरी जावं लागतं
Friendship Goal
Friendship Goal esakal

Friendship Goal : लग्नानंतर मुलीला तिचं माहेरचं घर सोडून सासरच्या घरी जावं लागतं. अशा परिस्थितीत मुलीचे मित्रमैत्रिणीही काहीसे दुरावतात.मग लग्नानंतर आपली मित्रमंडळी आपल्यापासून दुरावतील याची भीती आपल्याला वाटत राहते. त्यामुळे काही सोप्या टीप्स वापरून तुम्ही पुन्हा त्यांच्यासोबत कनेक्ट करू शकता.

Friendship Goal
Republic Day Special Recipe : खास प्रजासत्ताकदिनी नाश्त्याला बनवा तिरंगा पोहे

लग्नामुळे आयुष्याची नवी सुरुवात होते. अशा परिस्थितीत, सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्त्रिया अनेकदा मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेणं टाळतात. पण काही काळानंतर तुम्हाला मित्रांची खूप आठवण येते. अशा परिस्थितीत काही टिप्सच्या मदतीने तुम्ही लग्नानंतर पुन्हा मित्रांशी संपर्क साधू शकता.

Friendship Goal
Heart Health : ‘गोल्डन अवर’ म्हणजे काय? हृदविकाराच्या झटक्यानंतर का ठरतो महत्वाचा? वाचा सविस्तर

मेसेज

मित्रमैत्रिणींशी थेट बोलणं जर तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. अशा परिस्थितीत, आपण एक चांगली नोट लिहून सहजपणे आपल्या मित्रांशी संपर्क साधू शकतो.

सोशल मीडियातून कनेक्ट व्हा

जुने मित्र शोधण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाची मदत घेऊ शकता. त्यांना शोधून तुम्ही त्यांना मॅसेज पाठवू शकता आणि त्यांची विचारपूस करू शकता. यामुळे, मित्रांसोबत तुमचे संभाषण पुन्हा सुरू होईल आणि हळूहळू तुमची मैत्री घट्ट होऊ लागेल.

Friendship Goal
Healthy Lifestyle : एक्सपर्ट म्हणतात, "डाएट करू नका..."

मित्रांसोबत सहलीला जा

लग्नानंतर मित्रमैत्रिणींसोबत सोशलाईज करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे सहलीचे नियोजन करणं. याच्या मदतीने तुम्ही मित्रांसोबत भरपूर वेळ घालवाल शिवाय सहलीदरम्यान मौजमजा करून पुन्हा जुन्या दिवसांचा आनंद लुटू शकाल. अशा परिस्थितीत मित्रांसोबतचे तुमचे बंधही घट्ट होऊ लागतील.

रात्रीच्या जेवणासाठी त्यांना आमंत्रित करा

लग्नानंतर मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटण्यासाठी, तुम्ही त्यांना घरी जेवणासाठी आमंत्रित करू शकता. त्याचवेळी, बाहेर डिनरचां प्लॅन देखील करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com