
सॅमसंगने गॅलेक्सी झेड सीरिजमध्ये नुकतेच गॅलेक्सी झेड फोल्ड 4 आणि गॅलेक्सी फ्लिप 5 हे दोन प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोनसोबतच सॅमसंगने दोन नव्याकोऱ्या स्मार्टवॉचही सादर केल्या. गॅलेक्सी वॉच 5 आणि गॅलेक्सी वॉच 5 प्रो या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये कोणकोणते नवे फीचर्स दिले आहेत, त्याबाबत...
डिझाइन
गॅलेक्सी वॉच 4च्या तुलनेत वॉच 5 सीरिजमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. दोन्ही वॉचमधील वर्तुळाकार फ्लॅट डिस्प्लेसोबतच साइडमाऊंटेड दोन फंक्शन बटन आणि स्ट्रॅप होल्डरची डिझाईन लक्ष वेधून घेते. वॉच 5 आणि वॉच 5 प्रोमध्ये 1.4 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. स्पोर्टी लक आणि व्हर्च्युअली रोटेटिंग बेझेल्समुळे हे वॉच लक्षवेधी ठरते. सॅफायर क्रिस्टल डिस्प्ले आणि टिटॅनियम बॉडीमुळे वॉच मजबूत झाले आहे; मात्र वर्तुळाकार डिस्प्लेमुळे चौकोनी डिस्प्लेच्या तुलनेत अॅक्सेस करताना थोड्या अडचणी येतात.
स्मार्टनेस
गॅलेक्सी वॉच 5 सीरिजमध्ये प्रत्येकी 1.5 GB रॅम आणि 16 GB स्टोअरेज देण्यात आले आहे. तसेच दोन्ही वॉचमध्ये फूलटच AMOLED डिस्प्ले दिला असून, ब्राईटनेसही उत्तम दिला आहे. त्यामुळे भर उन्हातही वॉचमधील विविध रंगातील पर्याय सहज पाहता येतात. अद्ययावत ओएस 3 आणि गुगल प्लेमुळे तुम्हाला हवे ते अॅप या स्मार्टफोनवर अॅक्सेस करता येतात. LTE पर्याय दिल्याने मोबाईल नेटवर्कशी सहज कनेक्ट करता येते. कॉलिंग फीचर चांगले असले, तरी स्पीकर्सवरील कॉलिंगचा आवाज आणखी चांगला दिल्यास उत्तम होईल. गॅलेक्सी विअर अॅपच्या माध्यमातून वेगवेगळे वॉच फेसेस डाऊनलोड करता येतात, पण त्यांची फाईल साईज अधिक असल्याने डेटा आणि स्टोअरेज खर्ची घालावे लागते.
हेल्थ आणि फिटनेस
सॅमसंगने गॅलेक्सी वॉच 4 प्रमाणे वॉच 5 सीरिजमध्येही हेल्थ मॉनिटरिंगसाठी बायोअॅक्टिव्ह सेन्सर दिले आहे; मात्र वॉच 5 प्रोमध्ये रूट वर्कआऊट हे अतिरिक्त फीचर मिळतो. वॉच 5 सीरिजमध्ये फिटनेससंबंधित भरपूर फीचर्स दिले असून, त्यापैकी बॉडी कॉम्पोझिशन फिचर खासच म्हणावे लागेल. त्यात तुम्हाला शरीरातील फॅट, मसल्स आदींचीही माहिती मिळते. स्लीप ट्रॅकिंगबाबत या वॉचमध्ये अधिक पर्याय दिले आहेत. तुम्ही कधी झोपता, तसेच झोपल्यावर तुमचे हार्ट रेट, झोपेतील विविध टप्पे आदींची नोंद ठेवल्या जाते. झोपेत घोरण्याचे प्रमाणही नोंदवले जाते!
बॅटरी
सॅमसंगच्या गॅलेक्सी वॉच 5 मध्ये 410 एमएए, तर वॉच 5 प्रो मध्ये 590 एमएएचची बॅटरी दिली आहे. त्यामुळे ही वॉच सर्व फीचर्स वापरूनही जवळपास एक ते दीड दिवस आरामात वापरू शकता. त्यातही वर्कआऊट ट्रॅकिंग बंद केल्यास जवळपास तीन दिवस ही वॉच सहजपणे वापरता येते. 18 वॉटच्या चार्जरच्या मदतीने अडीच तासांत वॉच पूर्ण चार्ज होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.