

गरुडासन हे योग शास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचे आसन आहे. गरुड हा संस्कृत शब्द आहे. वाईट शक्तींशी लढण्याचे प्रतीक म्हणून गरूडाकडे पाहिले जाते. योगशास्त्रानुसार, गरुडासन हे उभे राहून केले जाणारे आसन आहे. गरुडासनाचा सतत सराव केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच शरीराला चांगला स्ट्रेचही मिळतो. किडनी आणि गुप्त रोगांवरही गरुडासनाच्या सरावाने फायदा होतो.योगशास्त्रानुसार, गरुडासन हे कठीण, बेसिक लेव्हलचे आसन आहे. याला विन्यास शैलीचे आसन मानले जाते. गरुडासनाचा सराव फक्त 15-30 सेकंदांसाठी एका पायावर करावा. त्यानंतर ते दुसऱ्या पायावर करू शकता.
गरुडासन केल्याने खांदे, मांड्या, हिप्स, टाचा,पायाची पोटरी, आणि पाठीचा वरचा भाग(लोअर बॅक) या शरीराच्या भागात ताण येतो. या आसनाचा नियमित सराव केल्यास टाचा आणि पायाच्या पोट-या मजबूत होतात.
भारतीय पौराणिक कथांमध्ये गरुडाला सर्व पक्षांचा राजा म्हटले जाते. गरुड हे भगवान विष्णूचे वाहन आहे आणि सूर्याचा सारथी अरुण याचा धाकटा भाऊ आहे. जेव्हा जेव्हा देव आणि असुरांमध्ये युद्ध होते तेव्हा गरुड देवांच्या बाजूने सक्रिय सहभाग घेतो.
गरुडासन करण्याचे फायदे या आसनाचा सराव करताना तुम्हाला तुमचे शरीर अकडल्यासारखे वाटू शकते. परंतू, नियमित सरावानंतर जेव्हा तुम्हाला या आसनाची सवय लागेल तेव्हा तुम्हाला तुमचे शरीर इतके हलके वाटेल, जणू तुम्ही हवेत उडत आहात अगदी गरुडासारखे. या आसनाच्या अभ्यासा दरम्यान तुम्ही मानसिकरित्या ठाम असणे खूप महत्त्वाचे आहे. जराही डगमगलात तर तुम्ही जमिनीवर पडण्याची किंवा तुमचा तोल जाण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही शांत डोक्याने आणि पूर्ण शक्तीने गरुडासन केले तर लवकरच तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात करू शकाल. याशिवाय शरीरातील सर्व सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात, डोक्यात आणि मनात सतत वाहत राहील.
गरुडासन नेमके कसे करावे?
सर्वप्रथम योगा चटईवर सरळ उभे राहावे.
नंतर हळूहळू उजवा गुडघा खाली वाकवावा.
डावा पाय उजव्या पायाभोवती गुंडाळण्याचा प्रयत्न करावा.
पायाच्या टाचा एकमेकांच्या वर येतील. तुमचा डावा पाय तुमच्या उजव्या नडगीच्या (पोटरीच्या) खालच्या भागाला स्पर्श केला पाहिजे.
दोन्ही हात खांद्याच्या उंचीपर्यंत वाढवा.उजवा हाताला डाव्याबाजूच्या चारही बाजूंनी गुंडाळाया दरम्यान, तुमचे कोपर 90 अंशांच्या कोनात वाकलेले असेल.
बॅलेन्स बनवून ठेवत हळूहळू हिप्सला खाली आणा.
गुडघे शरीराच्या मध्यभागीच राहतील, त्यांना शरीराच्या उजवीकडे किंवा डावीकडे वाकू देऊ नका.
15-30 सेकंद या स्थितीत राहा.श्वास लांब आणि हळूहळू घेत राहा सोडत राहा.
डोळे बंद करा आणि तिसऱ्या डोळ्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.तुमच्या मनातून नकारात्मक विचार दूर फेकण्यासाठी ते पुन्हा पुन्हा म्हणा.हळूहळू सामान्य स्थितीत परत या.
आता त्याच आसनाचा पुन्हा दुसऱ्या पायाने सराव करा.
आता बघू या गरुडासन केल्याने काय काय फायदे होतात.
1) गरूडासनामुळे जसे,मांड्या, नितंब, पाठीचा वरचा भाग (अपर बॅक) आणि खांदे या भागांना चांगला स्ट्रेच मिळतो त्यामुळे हे भाग मजबूत होण्यास मदत होते.
2) गरूडासनामुळे मानसिक स्ट्रेस कमी होण्यास देखील मदत होतो आणि मनाला शांती प्राप्त होते.
3) नियमितपणे गरूडासन केल्याने कंबर, पाय आणि हिप्स यांना अधिक लवचिक बनवण्यात मदत होते.
4) गरूडासनामुळे पाठीचा भाग लवचिक होता त्यामुळे पाठीचा त्रास असल्यास तो दुर होण्यास मदत होते.
5) गरूडासनामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते तसेच शरीराचे संतूलन वाढवते.
6) पायांचे स्नायू आणि कॉफ मसल्स मजबूत होतात.
रूमेटिज्म, आमवात, आर्थराइटिस आणि साइटिकाचे दुखणे कमी करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.