General Knowledge : घरातल्या गॅस सिलेंडरच्या पाईपलाही असते Expiry Date ?

पाइप सिलिंडरमध्ये एक्सपायरी डेट तपासल्यानंतरच बसवावा
General Knowledge
General Knowledgeesakal

General Knowledge : आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक वाईट प्रसंगांना तोंड देतो. त्यापैकी काही असे प्रसंग असे असतात जे आपल्याकडील सर्वकाही हिरावून घेतात. घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, अशी रोजचा पेपर वाचताना एखादी घटना असतेच. काहीवेळा घरातील सदस्यांच्या चुकीमुळे तर काहीवेळा तांत्रिक बिघाडामुळे गॅसचा स्फोट होतो.

घरांमध्ये होणाऱ्या अपघातांबद्दल बोलायचे झाले तर अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. हा स्फोट कसा झाला हे समजू शकत नाही? गॅस सिलेंडर नीट फिक्स केल्यावर स्फोट कसा झाला? सिलेंडरच्या पाईपची एक्सपायरी डेट असते हे लोकांना माहीत नाही.

General Knowledge
Gas Bill : गेल्या 18 वर्षांपासून हे जोडपं 'फुकट' गॅस वापरत होतं, बिल आल्यावर मात्र पायाखालची जमीन सरकली

त्यामुळे अपघातांना आमंत्रणच मिळतं. केवळ अशा सिलिंडरचा वापर करताना स्फोट होतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सिलिंडरमध्ये लावलेल्या पाईपची एक्सपायरी डेटही असते. हा पाइप सिलिंडरमध्ये एक्सपायरी डेट तपासल्यानंतरच बसवावा, हे लोकांना माहीत नाही.

सोशल मीडिया साइट Instagram वर एक व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. यामध्ये सिलिंडरच्या पाईपची एक्सपायरी डेट कशी तपासली जाते याची माहिती लोकांना देण्यात आली. यासाठी तुम्हाला BSI च्या केअर साइटवर जावे लागेल किंवा हे अॅप डाउनलोड करावे लागेल.

General Knowledge
Gas Cylinder च्या स्फोटात कऱ्हाड हादरलं! दोन मुलांसह सात जण होरपळून जखमी, पाच घरांचं 20 लाखांचं नुकसान

यानंतर, त्यामध्ये दिलेल्या एक्सपायरी डेटची पडताळणी करण्यासाठी विभागात जा. तुमच्या पाईपवर एक नंबर लिहिलेला आहे. ते येथे ऍड करा आणि तुमच्या पाईपची एक्स्पायरी कधी आहे याची तारीख तपासा.

मोठी दुर्घटना घडू शकते

सिलेंडर पाईप बसवण्याआधी दोन गोष्टी तपासल्या पाहिजेत. तुम्ही दर 18 ते 24 महिन्यांनी सिलिंडरचे पाईप बदलावे. याशिवाय नेहमी ISI चिन्हांकित पाईप घ्या. जर ही खूण असेल आणि तुमचा पाइप एक्सपायरी डेटच्या आधी फुटला तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. एक्सपायरी डेट ओलांडल्यानंतर अपघात झाला तर कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही.

General Knowledge
LPG Gas Price : घरगुती गॅस सिलिंडर दोनशे रुपयांनी होणार स्वस्त; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com