Beauty Care Video : संक्रातीला तमन्नासारखा ग्लोइंग चेहरा हवा असेल तर घरीच बनवा 'हा' होममेड स्क्रब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Care

Beauty Care Video : संक्रातीला तमन्नासारखा ग्लोइंग चेहरा हवा असेल तर घरीच बनवा 'हा' होममेड स्क्रब

Beauty Care : तमन्ना भाटिया आज तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अलीकडेच, वोग इंडियाने तमन्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याचे रहस्य उघड केले आहे. तमन्नाने चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

तमन्ना घरीच बनवते स्क्रब

तमन्ना भाटिया सांगते की, ती त्वचेची काळजी घेण्यासाठी घरी स्क्रब तयार करते, तिने ही पद्धत तिच्या आईकडून शिकून घेतली. हे तयार करणे खूप सोपे आहे आणि त्याच्या मदतीने डेड स्किन पेशी सहजपणे काढल्या जाऊ शकतात. (Skin Care)

तमन्ना भाटियाचे होममेड फेशियल स्क्रब

तमन्ना भाटिया सांगते की, तिच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीला, जेव्हा तिच्या त्वचेवर केमिकलवर आधारित अनेक उत्पादने वापरली जात होती, तेव्हा ती हे नैसर्गिक स्क्रब बनवत आणि लावत असे.

या 3 गोष्टी मिसळून स्क्रब तयार करा

हा स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतील, चंदन, मध आणि कॉफी. एका बाउलमध्ये या तीन गोष्टी मिक्स करा, पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्याला हलके चोळून लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. आता हाताने हळू हळू बाहेर काढा आणि शेवटी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावर विलक्षण चमक येईल.

हेही वाचा: Bipasha Basu Beauty Tips : चाळीशी उलटल्यावर आई झाली तरी मात्र तारुण्य तिशीतलं, कसं? वाचा ब्युटी सीक्रेट

केमिकल बेस्ड प्रोडक्ट वापरू नका

आजकाल लोक बाजारात मिळणारे केमिकल बेस्ड महागडे स्क्रब पसंत करतात, पण कधी कधी ते चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा खराब होतो किंवा निर्जीव दिसू लागतो, त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचाच वापर करा.