Skin Care: खाल तूप तर येईल रूप… त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘तुप’ अत्यंत फायदेशीर

तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून तुम्ही ते त्वचेसाठीदेखील वापरू शकता. तुपामुळे त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात.
ghee
gheesakal

भारतीय घरांमध्ये वर्षानुवर्षे तूप वापरले जात आहे. तुपाचा वापर केवळ स्वयंपाकातच नाही तर त्वचेची काळजी घेण्यासाठीही केला जात आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. भारतीय संस्कृतीत अनेक वर्षांपासून त्वचेची काळजी घेण्याचा नैसर्गिक उपाय म्हणून तुपाचा वापर केला जात आहे.

‘खाशील तूप तर येईल रूप’… पू्र्वी अशी एक म्हण होती. तुपात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के असतात, जे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. या लेखात आम्ही तुम्हाला तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये तूप वापरण्याचे फायदे सांगणार आहोत.

मॉइश्चरायझर

तूप हे त्वचेसाठी उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यात उच्च पातळीचे फॅटी ऍसिड असतात, जे ओलावा टिकवून ठेवण्यास आणि आपली त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. तुपात स्क्वॅलीन हे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट देखील असते जे त्वचेला फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवण्यास मदत करते. त्वचेवर तूप लावल्याने त्वचा अधिक मऊ होते.

ghee
Diabetes: उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी या आरोग्यदायी पेयांचे नक्की सेवन करावे

अँटी एजिंग प्रॉपर्टी

व्हिटॅमिन ए, डी आणि ई तुपात आढळतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ही जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची असतात. व्हिटॅमिन ए त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवते. व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे, जो त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतो. तुपाचा रोज वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या येण्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

इरिटेटेड स्किन झालेल्या त्वचेवरही तूप खूप फायदेशीर आहे. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे इरिटेटेड स्किनला शांत करण्यास मदत करतात. तुपामध्ये ब्युटीरिक ऍसिड देखील असते, एक नैसर्गिक फॅटी ऍसिड जे खराब झालेल्या त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते. त्वचेवर तूप लावल्याने लालसरपणा, सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

ghee
Health Tips: व्यायाम करण्यापूर्वी 'हे' पदार्थ खा, मिळेल झटपट एनर्जी

स्किन केअरमध्ये तुपाचा समावेश कसा करावा

  • चेहऱ्याला थोडे तूप लावून हलक्या हातांनी मसाज करा. नियमित मॉइश्चरायझर म्हणून वापरा.

  • फाटलेल्या ओठांसाठीही तूप वापरता येते. यामुळे ओठ मऊ होतात.

  • याशिवाय शिया बटरमध्ये तूप मिसळून शरीराला लावता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com