झोपेतून उठल्यानंतर तुम्हालाही थकवा जाणवतो? Sundar Pichai यांनी सांगितला कानमंत्र

एखाद्या व्यक्तीने कितीही तास झोप घेतली तरी त्याला नेहमीच थकवा जाणवतो.
google ceo sundar pichai sleeping tricks nsdr technique for relaxation
google ceo sundar pichai sleeping tricks nsdr technique for relaxationesakal
Summary

एखाद्या व्यक्तीने कितीही तास झोप घेतली तरी त्याला नेहमीच थकवा जाणवतो.

आजच्या लाइफस्टाइलमध्ये (Lifestyle)अनेकजण ज्या पद्धतीने आपले जीवन जगत आहेत, त्यात निवांत आराम करणे शक्य होत नाहीयेय. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने कितीही तास झोप घेतली तरी त्याला नेहमीच थकवा जाणवतो. हा थकवा घालवण्यासाठी आणि आराम मिळवण्यासाठी अनेकजण योगा करतात, अनेक जण म्युझिक ऐकतात. अशा परिस्थितीत गुगल आणि अल्फाफॅटचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी एक ट्रिक्स सांगितली, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. खरं तर झोप घेऊनही रिफ्रेश होणं शक्य नसेल तर काय करायचं ते कसं करायचं हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

google ceo sundar pichai sleeping tricks nsdr technique for relaxation
रात्री वारंवार झोप मोड होतेय? तुमच्या चूकीच्या सवयी असू शकतात कारण

ज्यांना योग आवडत नाही, त्यांच्यासाठी ते फायदेशीर आहे.

सुंदर पिचाई यांनी नॉन स्ली रेस्ट (NSDR) टेक्निकविषयी सांगितले आहे.ते म्हणाले की, त्यांना स्वत: ला योगा आवडत नाही. अशावेळी आराम मिळण्यासाठी हे टेक्नीक अत्यंत उपयुक्त ठरतं. झोपण्यापूर्वी असं केल्याने झोपही लवकर येते आणि साधारण 6 तास झोपून तुम्हाला पूर्णपणे रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल. आपल्या स्वत: च्या लक्षात आले असेल की 10 तास झोप घेतल्यानंतरही बऱ्याच लोकांना आराम वाटत नाही.

google ceo sundar pichai sleeping tricks nsdr technique for relaxation
दुपारी ऑफिसमध्ये येणारी झोप कशी टाळाल? जाणून घ्या सोप्या टिप्स

जाणून घ्या काय आहे NSDR टेक्निक

या टेक्निकमध्ये जमिनीवर डोळ्यावर पट्टी बांधून झोपावे लागते. त्यानंतर आपले शरीर आणि हात आणि पायांना रिलक्स सोडा. त्यानंतर एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करावं लागतं. या दिवसात तुम्ही निळ्या आकाशाचा किंवा अंधाऱ्या खोलीचा विचार करू शकता. हे करताना या वेळी शरीराच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष दिलं जातं. स्वत:ला रिलॅक्स वाटावं यासाठी या प्रकारची टेक्निक वापरतो, असं पिचाई यांनी सांगितलं. ज्या लोकांना झोपायला त्रास होतो ते देखील हे फॉलो करू शकतात. त्याचे पालन केल्याने लवकर झोपही लागते. त्याचबरोबर ताणही कमी होतो.

सुंदर पिचाई यांचा फिटनेस मंत्र

सुंदर पिचाई म्हणाले की, ते रोज 6 ते 7 तास झोप घेतात, त्यानंतर ते सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान उठतात. तसेच गेल्या १५ वर्षांपासून एकच नाश्ता करत आहे. नाश्त्यासाठी ते अंडी टोस्ट आणि चहा घेतात. पिचाई यांना नाश्त्याच्या वेळी बातम्या वाचायला आवडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com