
तरूण वयात केस पांढरे होतायत ? अक्रोडचा असा करा वापर...
मुंबई : आजकाल पांढरे केस हे वृद्धत्वाचे लक्षण राहिलेले नाही. तरूण वयातही केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. शरीरात विशिष्ट घटकांची कमतरता निर्माण झाल्याने केस पांढरे होतात. ही समस्या दूर करण्यासाठी अक्रोडचे कवच उपयुक्त ठरते.
हेही वाचा: Winter Hair Care: थंडीत केसांची अशी 'घ्या' काळजी; घरीच तयार करा तेल
अक्रोडमध्ये अनेक पोषक घटक असतात जे केसांसाठी उपयुक्त ठरतात. ब आणि ई जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, इत्यादी घटक अक्रोडमध्ये असतात. यांमुळे केसांचे क्युटीकल्स बळकट होतात आणि टाळूलाही पोषण मिळते. अक्रोड खाल्ल्यानेही केसांना पोषण मिळते. अक्रोड हा ब ७ जीवनसत्त्वाचा सर्वांत मोठा स्रोत मानला जातो.
हेही वाचा: Hair Tips : एक्सरसाइज करताना अशी घ्या केसांची काळजी
एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा. त्यात १० ते १५ अक्रोडचे कवच घाला. ते १५ मिनिटे मध्यम आचेवर उकडा. पाण्याचे प्रमाण अर्धे होणे आवश्यक आहे. त्यानंतर गॅस बंद करून थंड करत ठेवा. थंड झाल्यावर ते एका बाटलीत काढा आणि त्यावर ४ ते ५ थेंब रोजमेरी एसेन्शिअल तेल घाला.
हेही वाचा: बाळाच्या केसांची हळुवार काळजी कशी घ्याल?
आठवड्यातून दोनदा केस धुण्याआधी अक्रोडचे टॉनिक केसांवर शिंपडा. बोटांनी मालिश करा आणि काही वेळ तसेच ठेवा. एका तासाने शॅम्पूने केस धुवा.
हेही वाचा: भटकंतीसाठी बीचवर जाताय? अशी घ्या केसांची काळजी
पांढऱ्या केसांवर उपाय म्हणून अक्रोडच्या तेलाचा वापर केला जातो. यासाठी हेअर पॅकमध्ये तेलाचे काही थेंब घाला. अधिक परिणामासाठी त्यात दही, मध, एवोकाडो घाला. वरून अक्रोडच्या तेलाचे ७ ते ८ थेंब घाला. हे मिश्रण केसांना लावून २० मिनिटे ठेवा. केस धुतल्यानंतर त्यांना चमक येईल.
Web Title: Grey Hair In Young Age Use Walnut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..