Winter Hair Care Tips : हिवाळ्यात हे हेअरकेअर रूटीन करा फॉलो; केस होतील सॉफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Hair Care Tips

Winter Hair Care Tips : हिवाळ्यात हे हेअरकेअर रूटीन करा फॉलो; केस होतील सॉफ्ट

Winter Hair Care Tips : तुमची त्वचा कोरडी झालीय याची जाणिव होते तेव्हा हिवाळ्याला सुरूवात झालीय असे वाटायला लागते. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते तसेच केसांच्या अनेक समस्या सुरू होतात. हिवाळ्यातील अतिथंड वातावरणामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केस कोरडे होतात. केसांत कोंडा वाढतो, अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

हेही वाचा: Winter Hair Care: थंडीत केसांची अशी 'घ्या' काळजी; घरीच तयार करा तेल

या समस्यां प्रत्येकालाच सहन कराव्या लागतात. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी नियमित हेअर केअर रुटीन फॉलो करणं आवश्यक आहे. केसांच्या देखभालीसाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नैसर्गिक उपचार करू शकता. पण, प्रत्येकाला ते जसत नाही. त्यामुळे केसांचे केअर रूटीन कसे फिट करावे हे पाहुयात.

हेही वाचा: Winter Hair Colour Tips: हिवाळ्यात ट्राय करा 'हे' हेअर कलर

कोमट पाण्याचा वापर

थंडीच्या दिवसात कडक पाण्याने अंघोळ केली जाते. पण, आम्ही जर तूम्हाला कोमट पाण्याचा वापर करा असे सांगितले तर तूम्हाला ते पटेल का. नाही. पण, कडक पाण्याचे अनेक दुष्परीणाम आहेत. त्यामुळे केस रूक्ष आणि कोरडे होतात. त्यांची मुळे कमकुवत होतात. त्यामुळे अंघोळीसाठी कडक पाणी घेऊ नका. किंवा केस धुण्यासाठी तरी कोमट पाणी वापरा.

हेही वाचा: Hair Care Tips : जाहीरातीत पाहिलेले लोण्यासारखे केस खरच होतील?; हे कॉफी मास्क करतील मदत!

स्कार्फ, कॅपचा वापर करा

हिवाळ्यात स्वेटर, मफलर सगळेच वापरतात. पण, केसांसाठी काहीच सुरक्षाकवच वापरले जात नाही. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यावर महिलांनी डोक्याला स्कार्फ गुंडाळावा. तर पुरूषांनी कॅप वापरावी.

हेही वाचा: Hair Care Tips : हे घरगुती उपाय वाढवतील केसांची चमक

हेअरमास्कचा वापर

केसांसाठी नियमीत हेअरमास्कचा वापर करा. पण केवळ जाहीरात पाहुन हेअरमास्क घेऊ नका. तूमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच योग्य तो हेअरमास्क वापरा.

हेही वाचा: Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी 'या' घरगुती ट्रिक्स वापरा, नक्की फरक जाणवेल

केस नीट विंचरा

हिवाळ्यात केस कोरडे झाल्याने ते नीट विंचरता येत नाहीत. गडबडीच्या वेळेला तर वरवरचे केस विंचरून आपण कामासाठी बाहेर पडतो. त्यामुळे केसांमध्ये अधिक गुंता होतो. त्यामुळे केस नीट विंचरा. केस ओले असतील तर ते विंचरू नका.

हेही वाचा: Hair Care tips : केस हेल्दी करण्यासाठी हे ५ पॉईंट्स लक्षात ठेऊन वापरा ॲपल साइडर

केसांना हीट देणारी स्टाईल करू नका

कार्यक्रमासाठी केसांची वेगवेगळी स्टाईल केली जाते. अनेकवेळा त्यासाठी हेअर स्ट्रेटनर वापरला जातो. त्यामुळे केस अधिकच रूक्ष होतात. हिवाळ्यात अशा गोष्टी टाळा.